शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

आता सोनपुरी येथील जागेसाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST

नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सर्वात पुर्वी ग्राम टेमनी येथील जागा बघितली होती. मात्र गावकऱ्यांच्या विरोधामुळे नगर परिषदेला ते गाव विसरावे लागले. त्यानंतर ग्राम रतनारा येथे जागा बघण्यात आली होती. मात्र ग्रामसभेत जागा देण्यास विरोध झाल्याने ती जागाही नगर परिषदेच्या हातून गेली होती.आता मागील महिन्यात जवळील ग्राम कारंजा येथील जागा बघण्यात आली होती.

ठळक मुद्देघनकचरा प्रकल्पाचा विषय थंडबस्त्यात : खासगी वाटाघाटीने खरेदीचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्यामुळे अडचणीत असलेल्या नगर परिषदेची आता ग्राम सोनपुरी येथील जागेसाठी धडपड सुरू आहे. प्रकल्पासाठी येथील जागा खासगी वाटाघाटीतून खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू असून तसा प्रस्ताव सभेत मांडला जाणार आहे. त्यामुळे आता येथे तरी काही हाती लागते काय याकडे लक्ष लागले आहे.नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सर्वात पुर्वी ग्राम टेमनी येथील जागा बघितली होती. मात्र गावकऱ्यांच्या विरोधामुळे नगर परिषदेला ते गाव विसरावे लागले. त्यानंतर ग्राम रतनारा येथे जागा बघण्यात आली होती. मात्र ग्रामसभेत जागा देण्यास विरोध झाल्याने ती जागाही नगर परिषदेच्या हातून गेली होती.आता मागील महिन्यात जवळील ग्राम कारंजा येथील जागा बघण्यात आली होती.येथील ग्रामसभेतही गावकऱ्यांन जागा देण्यास विरोध केल्याने तेथूनही नगर परिषदेला रिकाम्या परतावे लागले होते.जागेसाठी एवढी धडपड करूनही जागा मिळत नसल्याने नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प काही उभे झालेले नाही.अशात आता नगर परिषदेने ग्राम सोनपुरी येथे जागा बघितल्याची माहिती आहे. येथील जागा खरेदी करण्यासाठी जोडतोड सुरू असल्याची माहिती असून तसा प्रस्ताव नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत मांडला जाणार आहे. विशेष म्हणजे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा लागत असल्याने शहरातील कचरा आपल्या गावात येणार हे ऐकूनच गावकरी जागा देण्यास नकार देतात.परिणामी गोंदिया नगर परिषदेकडे आजही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही ही शोकांतिका आहे.शुक्रवारी सर्वसाधारण सभानगर परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या शुक्रवारी (दि.१३) बोलाविण्यात आली आहे.फक्त तीनच विषयांसाठी ही सभा घेतली जात असून या सभेतील पहिलाच विषय ग्राम सोनपुरी येथील जागा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी खरेदी करण्याबाबतचा आहे. त्यानंतर नगर परिषदेची हद्द वाढविणे व नगर परिषद हद्दीत सेंट्रल हॉस्पीटल मागील म्हाडा करिता आरक्षीत जागेचे आरक्षण वगळण्याचा विषय मांडला जाणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाdumpingकचरा