खरा नाही दिला म्हणून झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:34 IST2021-09-04T04:34:46+5:302021-09-04T04:34:46+5:30

साखरीटोला : रात्रीच्या वेळी पानठेल्यावर उभ्या असलेल्या तरुणाने खरा नाही दिला म्हणून बेदम मारहाण केली. या घटना सालेकसा पोलीस ...

Not true | खरा नाही दिला म्हणून झोडपले

खरा नाही दिला म्हणून झोडपले

साखरीटोला : रात्रीच्या वेळी पानठेल्यावर उभ्या असलेल्या तरुणाने खरा नाही दिला म्हणून बेदम मारहाण केली. या घटना सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत साखरीटोला (सातगाव) येथे २५ ऑगस्टला रात्रीच्या ११.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. आरोपीवर ३०७ कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आरोपीचे नाव राजेश आको टेकाम (४५) साखरीटोला येथील रहिवासी आहे. २५ ऑगस्टला रात्रीच्यावेळी शुभम कांतीलाल अग्रवाल हा तरुण संताजी जगनाडे चौकातील एका पानठेल्यावर उभा होता. दरम्यान, आरोपी राजेश टेकाम त्या ठिकाणी आला शुभमला खरा मागितला पण त्याने देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात राजेश टेकामने लाठीकाठीने त्याच्या डोक्यावर मस्तकावर वार केले. त्यामुळे शुभमच्या मस्काला टाके लागले. त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले.

Web Title: Not true