अहमदाबाद-हावडा, छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये आरक्षण मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 05:00 AM2020-11-23T05:00:00+5:302020-11-23T05:00:23+5:30

कोरोनाच्या संक्रमणामुळे २५ मार्चपासून रेल्वेची प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यानंतर महिनाभरापूर्वी काही रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशेच्यावर प्रवाशी रेल्वे गाड्या धावत होत्या. सध्या स्थितीत ही संख्या कमी झाली आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावर सध्या स्थितीत गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस , गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र या एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये सुध्दा आरक्षण मिळणे कठीण झाले आहे.

No reservation in Ahmedabad-Howrah, Chhattisgarh Express | अहमदाबाद-हावडा, छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये आरक्षण मिळेना

अहमदाबाद-हावडा, छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये आरक्षण मिळेना

googlenewsNext
ठळक मुद्देडिसेंबरपर्यंत आरक्षण कोटा फुल : प्रवाशांची वेटींग लिस्ट वाढतेय

  लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी काही रेल्वे मार्गावरील एक्स्प्रेस व मेल गाड्या सुरु करण्यात आल्या आहे.  त्यामुळे सध्या बहुतेक रेल्वे गाड्यांचा आरक्षण कोटा फुल झाला आहे. अहमदाबाद-हावडा, सिकंदराबाद, दरभंगा एक्स्प्रेस , छत्तीसगड एक्स्प्रेसचे रिझव्र्हेशन फुल झाले असून या गाड्यांमध्ये डिसेंबरच्या अखरे आरक्षण मिळणे कठीण आहे. या गाड्यांची वेटींग लिस्ट दीडशेच्यावर असल्याने या गाड्यांनी प्रवास करण्याच्या बेतात असलेल्या प्रवाशांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. 
कोरोनाच्या संक्रमणामुळे २५ मार्चपासून रेल्वेची प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यानंतर महिनाभरापूर्वी काही रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशेच्यावर प्रवाशी रेल्वे गाड्या धावत होत्या. सध्या स्थितीत ही संख्या कमी झाली आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावर सध्या स्थितीत गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस , गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र या एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये सुध्दा आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. केवळ गोंदिया ते नागपूरपर्यंतचे आरक्षण मिळत आहे. 

या गाड्यांमध्ये आरक्षण फुल्ल
हावडा-मुंबई मार्गावरील अहमदाबाद-हावडा, दरभंगा एक्सप्रेस, सिकंदरबाद, छत्तीसगड, जनशताब्दी एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, हावडा-पुणे, आझाद हिंद एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांमध्ये डिसेंबरपर्यंत आरक्षण फुल असून सध्या १०० वेटींग लिस्ट सुरु आहे. 

जिल्ह्यात रेल्वे फेऱ्या अजूनही बंद 
२५ मार्चपासून जिल्ह्यांतर्गत रेल्वे फेऱ्या बंद आहेत. यात गोंदिया-चांदाफोर्ट, गोंदिया बालाघाट, गोंदिया-इतवारी, गोंदिया-दुर्ग या रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची समस्या कायम असून त्यांना बससेवा अथवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. 

Web Title: No reservation in Ahmedabad-Howrah, Chhattisgarh Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे