शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिने लोटले, एकाही महिलेला लाभ नाही

By admin | Updated: January 3, 2016 02:21 IST

महिला व तरूणींचा विकास व्हावा यासाठी राज्य शासनाने ग्राम पंचायतींना झालेल्या उत्पन्नातून १० टक्के रक्कम महिला सक्षमीकरणावर खर्च करायची,

चार योजनांसाठी सात हजार अर्ज : महिला व बालकल्याण विभाग उदासीननरेश रहिले गोंदियामहिला व तरूणींचा विकास व्हावा यासाठी राज्य शासनाने ग्राम पंचायतींना झालेल्या उत्पन्नातून १० टक्के रक्कम महिला सक्षमीकरणावर खर्च करायची, असा नियम बनविला. महिलांच्या विकासासाठी शासकीय अनुदान, निधीही देण्यात आला. त्याचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या महिलांच्या योजनांसाठी अर्ज मागविण्यात आले. चार योजनांसाठी सात हजारांवर अर्ज आलेत, मात्र एकाही महिलेला हा लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे महिलांचे कल्याण करणारा विभागच उदासीन असल्याची प्रचिती येत आहे.शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयातर्फे सर्व जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागांतर्गत महिलांच्या कल्याणासाठी चार योजना राबविल्या जातात. त्यात मुलींना सायकल वाटप करणे, महिलांना शिलाई मशीन देणे, महिलांना संगणक प्रशिक्षण देणे व सौंदर्य प्रसाधनाचे प्रशिक्षण देण्यात येते. मार्च ते एप्रिल या आर्थिक वर्षात महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. परंतु सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे नऊ महिने लोटले असले तरी एकाही महिलेला या योजनांचा लाभ दिला नसल्याची खंत व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील ५०२ मुलींचा दोन चाकी सायकल या विभागाकडून दिली जाऊ शकते. ५०५ शिलाई मशीन देण्याचे नियोजन या विभागाकडे आहे. ३ हजार महिला तरूणींना संगणक प्रशिक्षण तर ५०० महिला तरूणींना सौंदर्य प्रसाधन प्रशिक्षण देण्यात येऊ शकते. परंतु या आर्थिक वर्षात कोणताही लाभ देण्यात आला नाही. अनुसूचित जाती, जमाती व ओबीसीच्या विद्यार्थीनींना सायकल देण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील ३ हजार ५६८ विद्यार्र्थींनीचे अर्ज आले आहेत. परंतु त्यातील एकाही मुलीला लाभ देण्यात आला नाही. विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या सायकलींसाठी जी प्रक्रिया करावी लागते, ती प्रक्रिया अजूनपर्यंत या विभागाने सुरूच केली नाही. शिलाई मशिनसाठी ३ हजार ४२९ अर्ज आले आहेत. संगणक प्रशिक्षणासाठी ८३ अर्ज, सौंदर्य प्रसाधनाच्या प्रशिक्षणासाठी १५ अर्ज आले आहेत.