शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

पुढील आठवड्यात होणार सॅटेलाईट सर्व्हे

By admin | Updated: May 29, 2014 02:29 IST

शहराच्या सूर्याटोला परिसरातील बांधतलाव दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान मोठी समस्या निर्माण करते.

गोंदिया : शहराच्या सूर्याटोला परिसरातील बांधतलाव दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान मोठी समस्या निर्माण करते. या तलावाचे पाणी शहराच्या अनेक भागात शिरते. त्यामुळे अनेक दिवसांपर्यंत नागरिक समस्याग्रस्त राहतात. याबाबत आता सॅटेलाईल सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

इटियाडोह विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, बांधतलावाच्या पुरामुळे होणार्‍या नुकसानीच्या क्षेत्रात सॅटेलाईट सर्वेक्षण करण्यात येईल. हे सर्वेक्षण पुणेच्या एस.के. इंजिनिअरिंग कंपनीस देण्यात आले आहे. या कंपनीच्या वतीने पुढील आठवड्यात सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सॅटेलाईट सर्वेक्षणाच्या आधारावर ब्ल्यू झोन व रेड झोन घोषित करण्यात येतील. मुख्यत: २५ वर्षापेक्षा अधिक कालावधी बनविलेल्या घरांना ब्ल्यू झोनमध्ये समावेश करण्यात येईल. १00 वर्षापूर्वी बनलेल्या घरांना रेड झोनमध्ये दाखविण्यात येईल.

सदर विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे यांनी लोकमतला सांगितले की, बांधतलावाच्या पूरक्षेत्राचा प्रामुख्याने सर्वेक्षण होईल. या सर्वेक्षणाच्या आधारावर अतिक्रमण सिद्ध झाले तर जे घर अतिक्रमणात येतात त्यांना हटविणे शासनाचा उद्देश्य आहे. विशेष म्हणजे बांधतलावात येणार्‍या पुरामुळे अनेक वस्त्या जलमय होतात. कार्यकारी अभियंता एन.के. ढोरे यांच्यानुसार, बांधपासून एक नाला वाहतो. या नाल्याच्या जवळ किती घर तयार करण्यात आले आहे. किती ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. याची माहितीसुद्धा सदर सर्वेक्षणात समोर येईल. या सर्वेक्षणाची रिपोर्ट मिळाल्यानंतर ती जिल्हाधिकार्‍यांकडे सोपविण्यात येईल.

सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश्य नाल्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटविणेसुद्धा आहे. हे अतिक्रमण भविष्यात शासनाकडून हटविले जावू शकते. काही जणांना सदर अतिक्रमण किंवा त्यांचे खरेदी केलेल्या घर-जमिनीचा मोबदलासुद्धा शासनाकडून दिला जावू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेक्षणासाठी एस.के. इंजिनिअरिंग कंपनीला कंत्राट दिले आहे. निविदा आमंत्रित करण्यात आली आहे. दिलेल्या कंत्राटानुसार २६ लाख रूपये सदर कंपनीला द्यावे लागेल. वास्तव म्हणजे शासनाने या कामासाठी ३४ लाख रूपये मंजूर केले आहेत. (प्रतिनिधी)