शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

नजरअंदाज पैसेवारी १०८ पैसे

By admin | Updated: October 22, 2014 23:19 IST

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असले तरी पीक मात्र चांगले येण्याची शक्यता प्रशाकीय अहवालात वर्तविण्यात आली आहे. कृषी विभागाच्या नजरअंदाज पैसेवारीनुसार सध्याच्या परिस्थितीत पैसेवारी १०८ पैसे

गोंदिया : यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असले तरी पीक मात्र चांगले येण्याची शक्यता प्रशाकीय अहवालात वर्तविण्यात आली आहे. कृषी विभागाच्या नजरअंदाज पैसेवारीनुसार सध्याच्या परिस्थितीत पैसेवारी १०८ पैसे दाखविण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी धानाचे उत्पादन चांगले होणार या अपेक्षेने शेतकऱ्यांमध्ये उत्साह आणि आशादायक वातावरण दिसून येत आहे.गेल्यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते. सततच्या पावसाने ओल्या दुष्काळाची परिस्थिती होती. ऐन धान कापणीच्या सुमारासही पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांच्या धानाचे बरेच नुकसान झाले होते. गेल्यावर्षी याच काळात कााढण्यात आलेली नजरअंदाज पैसेवारी अवघी ६८ पैसे होती. त्या तुलनेत यावर्षीची नजरअंदाज पैसेवारी १०८ पैसे असणे म्हणजे चांगले पिक येण्याचे संकेत असल्याचे मानले जात आहे.गेल्यावर्षी काढण्यात आलेल्या अंतिम पैसेवारीत तिरोडा तालुक्यातील ११ गावांमध्ये अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी होती. त्यामुळे त्या गावांना विविध प्रकारच्या शासकीय सवलती देण्यात आल्या होत्या. वास्तविक त्या वेळी इतरही तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसून नुकसान झाले होते. मात्र तालुक्याचे सरासरी उत्पन्नाची पैसेवासी ५० पैसेपेक्षा अधिक आल्याने त्या गावांना कोणताही लाभ होऊ शकला नाही.गेल्यावर्षी जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत तब्बल १७६१ मिमी पाऊस बरसला होता. वास्तविक जिल्ह्यात वर्षाकाठी सरासरी १३२७.४४ मिमी पाऊस पडतो. परंतू गेल्यावर्षीचा पाऊस सरासरीच्या तुलनेत १३३ मिमी होता. तरीही नुकसानीचा पिकांच्या आकडा फारसा वाढला नाही. यावर्षी ३० सप्टेंबरपर्यंत अवघा ९५६.९ मिमी पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत ७२ टक्केच आहे. म्हणजे २८ टक्के पाऊस कमी पडला आहे. तरीही यावर्षी पिकांची स्थिती उत्तम असल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे.गेल्या १४ आॅक्टोबरला जिल्हत ३१.१ मिमी पाऊस पडला. पावसाळ्याच्या शेवटच्या काही दिवसात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पिकांना पावसाची आवश्यकता होती. त्यावेळी बरसलेला हा पाऊस पिकांसाठी जीवनदायी ठरला आहे. त्यामुळे बरीच पिके वाया जाण्यापासून वाचली.गेल्यावर्षी गोंदिया तालुक्याची नजरअंदाज पैसेवारी अवघी ६८ पैसे होती. ती यावर्षी १११ पैसे आहे. गोरेगाव तालुक्याची पैसेवारी ६२ होती ती यावर्षी १०९ पैसे झाली आहे. तिरोडा तालुक्याची ६६ वरून १०४ पैसे, अर्जुनी मोरगाव तालुक्यात ६७ वरून १०७ पैसे, देवरी तालुक्यात ६४ वरून ११४ पैसे, आमगाव तालुक्यात ६५ पैशावरून १०६ पैसे, सालेकसा तालुक्यात ७४ वरून १०७ पैसे तर सडक अर्जुनी तालुक्यात गेल्यावर्षीच्या ६६ पैसावरून यावर्षी १०६ पैसे एवढी नजरअंदाज पैसेवारीत वाढ झाली आहे.एकूणच यावर्षीच्या धानपिकाचे उत्पादन चांगले येण्याचे हे संकेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दारी यावर्षी सुख-समृद्धी नांदेल अशी अपेक्षा सर्वांना लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)