शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांसाठी राष्ट्रवादीचा मोर्चा

By admin | Updated: February 5, 2016 01:16 IST

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा आरोग्य प्रशासनाने आश्वासन देऊनही भरल्या नाही.

रुग्णांची हेळसांड : केशोरी प्रा.आ.केंद्रातील प्रकारकेशोरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा आरोग्य प्रशासनाने आश्वासन देऊनही भरल्या नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष नामदेव डोंगरवार, युवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष योगेश नाकाडे यांच्या नेतृत्वात गुरूवारी (दि.४) दुपारी प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक मोर्चा काढण्यात आला.यासंदर्भात एक महिन्यापूर्वी तालुका आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य विभागाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन रिक्त जागा त्वरीत भरण्याची विनंती केली होती. परंतु जि.प.आरोग्य प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे या भागातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. रुग्णांची हेळसांड दूर करण्यासाठी हा मोर्चा काढून लक्ष वेधण्यात आले.मोर्चाची सुरूवात गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून करण्यात आली. केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा त्वरित भरा, निष्क्रीय जिल्हा आरोग्य प्रशासन हाय-हाय अशा घोषणा देत हा मोर्चा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडकला. मोर्चाचे रुपांतर सभेत करण्यात आले. याप्रसंगी सुधीर साधवानी, जनार्धन काळसरपे, गोवर्धन पाटील ताराम, गजानन कोवे, अनिल मेहता, विकास रामटेके, संजय कांबळे, श्रीकांत घाटबांधे यांच्यासह जवळपास २०० च्यावर युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन गजानन कोवे यांनी तर आभार सरीता नंदेश्वर यांनी मानले. (वार्ताहर)२४ तासांत पदे भरणारमोर्चाला मार्गदर्शन करताना मनोहर चंद्रिकापुरे यांनी रुग्णांची कशी गैरसोय होते हे सांगितले. मोर्चाला समोरो जाण्यासाठी आरोग्य प्रशासनाने आपले प्रतिनिधी म्हणून शुक्ला आणि तालुका वैद्यकीय अधिकारी राऊत यांना पाठविले. येत्या २४ तासात काही महत्वाची रिक्त पदे भरण्याच्या लेखी शर्थीवर मोर्चा विसर्जीत करण्यात आला.