शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
3
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
4
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
5
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
8
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
9
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
10
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
11
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
12
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
13
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
14
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
15
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
16
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
17
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
18
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
19
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
20
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
Daily Top 2Weekly Top 5

पुरेशा सिंचन सुविधांअभावी शेतकऱ्यांना नापिकीचा फटका

By admin | Updated: December 16, 2014 22:56 IST

मागील वर्षी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. मात्र यावर्षी पुन्हा पावसाअभावी कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागते आहे. या परिसरात अल्पमध्यम शेतकऱ्यांची

रावणवाडी : मागील वर्षी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. मात्र यावर्षी पुन्हा पावसाअभावी कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागते आहे. या परिसरात अल्पमध्यम शेतकऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. मात्र परिसरात सिंचनाची काहीच व्यवस्था नसल्यामुळे येथील शेतकरी कुटुंब या आपत्तीचा सामना करीत आहेत.
राज्य शासनाने या परिसरातील शेतकऱ्यांचा शेत जमिनीला सिंचन व्यवस्था म्हणून सन २००६ पासून काटी, रजेगाव उपसा सिंचन योजनाच्या भागात सुरु आहे. शासनाच्यावतीने या योजनेवर कोट्यवधी रुपये ही खर्च केले आहे. मात्र ही योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विभागानी नियमबाह्य पद्धतीचा अवलंब केल्यामुळे ही योजना निर्जिव होऊन शेतकऱ्यांसाठी निरपयोगी ठरली आहे.
भूसंपादनापासून आजतागायत संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला. पुर्वी ही योजना पाईप लाईन द्वारे निर्मित होणार होती. मात्र संबंधित विभागाने अंदाज पत्रकात फेरबदल करुन खुले भयावह २० ते २२ फूट कालव्यातून शेतीला सिंचनासाठी कालव्याचे पाणी कसे आणि कोणत्या प्रकारे शेतीला सिंचन होणार असा अनुमान ठपका शेतकरी करीत आहेत. शासनाने प्रकल्प बांधकामाकरीता हवी तसी पुरेशी निधी संबंधित विभागाला दिली.
मात्र शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या सुपीक शेतजमिनीचा मोबदला स्वयंनिर्णयाने काही शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले असले तरी अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांना संपादित केलेल्या जमिनीचा मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात आले असल्यामुळे जमिन मालकात या योजनेबद्दल कमालिचा रोष निर्माण झाला आहे.
संबंधित विभागाने शेतकऱ्यांना स्वयंमर्जीने ठरवलेली अतीअल्प तोडकी निधी मंजूर करुन ही योजना शासनाची आहे. अशी दहशत निर्माण केली असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी मंजूर झालेली निधीची उचल केली. शेतकऱ्यांच्या ओलीत जमिन बिगर ओलीत दर्शवण्यात आली. शेतातील मोल्यवान वृक्षही या कालव्यात गेले. त्याचाही मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. दिड दोन लाख रुपयात या भागात कुठे ही घर बांधणीकरीता भुखंड लोकांना मिळत नाही. मात्र संबंधित विभागाने शेतकऱ्यांना एका भुखंडाएवढाही मोबदला शेतकऱ्यांना दिला नाही असे कृत या योजनेत झाले असलेतरी वर्तमानमध्ये असलेले शासन शेतकऱ्यांना न्याय देईल अशी अपेक्षा आताही शेतकऱ्यांना वाटत आहे.
सध्याच्या काळात या परिसरात धानाचे पिक वैरण म्हणूनच कापणी केली असून त्यापिकाला वैरणात रुपांतर करण्यासाठी श्ोतकऱ्यांना मळणी करावी लागत आहे. एका दिवसाचा मळणी मधून एक ते दिड पोतेच पिकाचे उत्पादन हाती येत असून उत्पादनात मोठी घट झाली. सध्या रबी पीक तरी परिस्थिती सावरेल अशी अपेक्षा असताना परतीचा पाऊसही यावेळी झाला नाही. त्यामुळे जमिनीत आद्रताही नाही.
त्यामुळे सध्या स्थितीत २० ते २६ टक्के पेरणी आहे. अशी बिकट आणि बेहाल अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. नापिकीचा जबर फटका बसल्याने ग्रामीण भागाचा लघू व्यवसायही थंडावला आहे. या पार्श्वभूमीवर शासन काहीतरी उपाय योजनाकरुन या भागाकरीता विशेष पॅकेज मिळेल अशी आशा बाळगुन आहेत. (वार्ताहर)