शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
3
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
4
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
5
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
6
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
7
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
8
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
9
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
10
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
11
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
12
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
13
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
14
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
15
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
16
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
17
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
18
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
19
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
20
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुदतवाढ की खरेदी बंद गूढ कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 05:00 IST

खरीप हंगामाला सुरुवात झाली तरी रब्बीतील धान खरेदीचा तिढा सुटला नाही. परिणामी शाळा अधिग्रहीत करुन गोदामांवर तोडगा काढण्यात आला. मात्र, याला सुध्दा बराच विलंब झाला. त्यामुळे आतापर्यंत केवळ ४ लाख ३३ हजार क्विंटलच धान खरेदी करण्यात आली. अद्यापही २० लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी होणे शिल्लक आहे. त्यातच बुधवारी धान खरेदीची मुदत संपली. मुदत संपण्यापूर्वीच मुदतवाढीचे आदेश येणे अपेक्षित होते.

ठळक मुद्देशेतकरी संभ्रमात : लाखो क्विंटल धानाचे होणार काय

लाेकमत न्यूज नेटवर्कगोदिया : रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीची मुदत बुधवारी (दि. ३०) संपली; पण अद्यापही २० लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी होणे बाकी आहे. त्यातच धान खरेदीला १५ दिवसांची मुदतवाढ दिली जाणार असल्याचे सांगितले जात होते; पण बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत रब्बीतील धान खरेदीला मुदतवाढीचे आदेश जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे मुदतवाढ की धान खरेदी बंदचे गूढ कायम होते. मागील खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची अद्यापही उचल करण्यात करण्यात आली नाही. परिणामी लाखो क्विंटल धान गोदामांमध्ये पडून आहे. त्यामुळेच यंदा रब्बीतील धान खरेदी एप्रिल महिन्यापासून सुरू झाली नाही. खरीप हंगामाला सुरुवात झाली तरी रब्बीतील धान खरेदीचा तिढा सुटला नाही. परिणामी शाळा अधिग्रहीत करुन गोदामांवर तोडगा काढण्यात आला. मात्र, याला सुध्दा बराच विलंब झाला. त्यामुळे आतापर्यंत केवळ ४ लाख ३३ हजार क्विंटलच धान खरेदी करण्यात आली. अद्यापही २० लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी होणे शिल्लक आहे. त्यातच बुधवारी धान खरेदीची मुदत संपली. मुदत संपण्यापूर्वीच मुदतवाढीचे आदेश येणे अपेक्षित होते. मात्र, यासंदर्भात आदेश प्राप्त झाले नव्हते. राज्य सरकारने रब्बी हंगामातील धान खरेदीला १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला; पण केंद्राकडून अद्यापही मुदतवाढीसंदर्भात कुठलेच पत्र पात्र झाले नसल्याने धान खरेदी सुरू राहणार की बंद, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. 

लाखो क्विंटल धान खासगी व्यापाऱ्यांच्या दारात- यंदा शासनाच्या नियोजनअभावी रब्बी हंगामातील धान खरेदीचे बारा वाजले आहे. रब्बीतील धान खरेदीची मुदत संपली तरी पूर्ण धान खरेदी झालेली नाही. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना लाखो क्विंटल धान खासगी व्यापाऱ्यांना अल्प दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड