शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

खासदार सुस्त, मंत्री हारतुऱ्यात व्यस्त, जनता त्रस्त

By admin | Updated: February 18, 2015 01:41 IST

भाजप-सेना युती शासनाचे १०० दिवस पूर्ण झाले. त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र गाजावाजा होतोय. राज्य मंत्रीमंडळात अर्जुनी मोरगावसारख्या आदिवासी, ...

संतोष बुकावन ल्ल भाजप-सेना युती शासनाचे १०० दिवस पूर्ण झाले. त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र गाजावाजा होतोय. राज्य मंत्रीमंडळात अर्जुनी मोरगावसारख्या आदिवासी, दुर्गम, नक्षलग्रस्त मतदारसंघाला स्थान मिळाले, हे येथील जनतेचे सुदैव. राज्याच्या प्रगती आढाव्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री उत्तीर्ण झाले असले तरी मतदारसंघाच्या ज्वलंत समस्यांबाबत अजूनही ते फारसे गंभीर झालेले नाहीत. दुसरीकडे लोकसभा निवडणूक होऊन ९ महिने उलटले, पण लोकांनी ज्यांना मोठ्या विश्वासाने निवडून दिले त्या खासदार नाना पटोले यांचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. त्यामुळे खासदार सुस्त, मंत्री हारतुऱ्यात व्यस्त आणि जनताजनार्दन त्रस्त, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गोंदिया जिल्ह्याला तत्कालीन अर्थमंत्री महादेवराव शिवनकर यांच्यानंतर तब्बल १५ वर्षानंतर स्थान मिळाले, ही निश्चितच जिल्हावासियांसाठी आनंदाची बाब आहे. अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातील जनतेचा तर आनंदच गगनात मावेनासा झाला आहे. आपला मंत्री म्हटल्यानंतर अपेक्षा बाळगणे हे गैर नाही. पण आपले आमदार हे केवळ अर्जुनी-मोरगावचेच नव्हे तर राज्याचे मंत्री झालेत याचे भान जनतेने सुद्धा ठेवणे आवश्यक आहे. विकासकामे व भेटीगाठींसाठी थोडासा संयम ठेवलाच पाहिजे. एका बाजूला जनतेचे बरोबरच आहे. यावर्षी पाणीटंचाईचे संकट उद्भवणार असल्याची चाहूल जनतेला लागली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १५ गावांसाठी असलेली नळयोजना महिनाभरापासून बंद आहे. पाच दिवसात नळयोजना सुरु होणार आशी खोटी उत्तरे अधिकारी देतात. लोकप्रतिनिधींना या उत्तराने हायसे वाटते, मात्र समस्या मार्गी लागत नाही याला काय म्हणावे? दरवर्षी पंचायत समिती कार्यालयात उन्हाळापुर्व पाणीटंचाई आढावा सभा घेतली जाते. या सभेचे अध्यक्ष आमदार असतात. यावर्षी १३ जानेवारीला सभा झाली. या सभेत मंत्रीमहोदय हजर राहू शकले नाहीत.अर्जुनी-मोरगाव बसस्थानकाचे १७ जानेवारी रोजी थाटात उद्घाटन पार पडले. अर्जुनी-मोरगाव-यवतमाळ या बससेवेला ना.बडोले यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. पण या बसचे वांधे संपलेले नाही. कधीकधी ही बस जातच नसल्याची ओरड प्रवाशांकडून केली जाते. यापूर्वी अर्जुनी येथून गोंदियासाठी बससेवा नव्हती. ती उद्घाटनानंतर सुरु करण्यात आली. एक नव्हे तर तीन फेऱ्या सुरु झाल्या. मात्र चालक-वाहक उपलब्ध राहात नसल्याने अनेकदा गोंदिया येथून बस येतच नाही. प्रवाशी बसच्या प्रतीक्षेत ताटकळत असतात. गोंदिया आगाराच्या ज्या बसेस आहेत, त्या ऐन ट्रेनच्या वेळेवर असल्याने पाहिजे तेवढ्या उपयोगी नाहीत. केवळ गोंदियाकडे जाणारी सकाळची बस अधिक सोईची आहे. अर्जुनी-मोरगाव ते कोहमारापर्यंत दिवसभर चालणारी एक बससेवा उपलब्ध झाल्यास प्रवाशांची गैरसोय टाळता येऊ शकते. सातत्याने मागणी करुनही या समस्येकडे लोकप्रतिनिधी व एसटी विभागाने अधिकारी कानाडोळा करतात.अर्जुनी-मोरगाव येथील एमआयडीसीचा प्रश्न रेंगाळत आहे. एक्सप्रेस ट्रेनचा अर्जुनी-मोरगाव येथे थांबा द्यावा. तेथे उड्डाणपुलाचा प्रश्न ऐरणीवर आहे. खासदार महोदय निवडून आल्यानंतर दिसतच नाही अशी ग्रामीण भागात ओरड आहे. या परिसरात बेरोजगारीचा भस्मासूर आहे. आपल्या साधनसमृद्धीवर आधारित उद्योगाला बराच वाव आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानावर कोट्यवधींचा खर्च होत आहे. मात्र येथे उद्यानच नाही. राष्ट्रीय उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या राष्ट्रीय उद्यानाला गतवैभव कधी लाभेल याची पर्यटकांना प्रतीक्षा आहे.