शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांचे स्थानकावर आंदोलन

By admin | Updated: December 20, 2014 01:48 IST

केंद्र शासनाच्या प्रस्तावित रस्ता वाहतूक व सेप्टी बिल २०१४ च्या नवीन कायद्यामुळे एसटीच्या परिचालनात अनेक बाधा व समस्या निर्माण होतात.

गोंदिया : केंद्र शासनाच्या प्रस्तावित रस्ता वाहतूक व सेप्टी बिल २०१४ च्या नवीन कायद्यामुळे एसटीच्या परिचालनात अनेक बाधा व समस्या निर्माण होतात. याचा संपूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. गुरुवारी १८ डिसेंबर रोजी गोंदियाच्या बस स्थानकावर एसटीच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा निषेध नोंदवून आंदोलन केले.
सदर आंदोलनात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी गोंदिया बस स्थानकावर आपल्या हातात फलक व झेंडे घेवून नवीन कायद्यात प्रस्तावित बदलास घेवून विरोध दर्शविला. त्यांनी आपल्या मागण्यांवर शासनाने लक्ष देण्याची मागणी केली. त्यांच्या मागण्यांमध्ये खासगी वाहनांना बस स्थानकावर उभे करून प्रवाशी भरणाऱ्या वाहनांना क्रमवार परवाना देवू नये, निविदा पद्धतीने प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना घेणाऱ्यांवर रोक लावावे, रस्त्यांवर वाहतूक व सुरक्षा बिल २०१४ मध्ये एसटीवर लादण्यात आलेल्या अनेक मारक कलमांना रद्द करावे, प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीच्या बसांचा विस्तार करावा व एसटीच्या विकासासाठी सहकार्य करावे, नवीन बसेसचा पुरवठा करावा आदी मागण्यांना घेवून एक दिवशीय आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाबाबत सांगण्यात आले की एसटी महामंडळ मोठ्या आर्थिक समस्येशी लढत आहे. महामंडळाकडे शासन लक्ष देत नसल्यामुळे एसटीची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. तसेच नवीन कायदा लागू झाल्यास कर्मचाऱ्यांवर त्याचा काय प्रभाव पडेल, याची कल्पनासुद्धा कर्मचाऱ्यांना नाही. अशात राज्यभरात एसटी महामंडळाच्या बस स्थानकात नवीन बसेसची मागणी असल्यावरही फेऱ्यांसाठी बसेस उपलब्ध नाहीत. या संदर्भात शासनाशी वेळोवेळी पत्र व्यवहारसुद्धा करण्यात आला. मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधीने ही बाब उचलून धरली नाही व शासनानेसुद्धा लक्ष दिले नाही. अशात केंद्र शासनाच्या रोड ट्रान्सपोर्ट व सेफ्टी बिल २०१४ नवीन प्रस्तावित कायद्यात बदल झाल्याने याचा सर्वाधिक प्रभाव एसटी महामंडळावर पडणार आहे. तरीसुद्धा शासनाला याचे काही देणे-घेणे नाही.
या संदर्भात महामंडळावर होणारा केंद्र शासनाच्या नवीन कायद्याचा प्रतिकूल प्रभाव पाहता, या मुद्याला हिवाळी अधिवेशनात अनेक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत संघटनेचे एक प्रतिनिधी मंडळ दिल्लीला गेल्याची माहितीसुद्धा मिळाली आहे. (प्रतिनिधी)