शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.सदस्याचे सभापतीच्या टेबलावर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

जिल्हा परिषदेच्या दैनदिन कामाला शनिवारी (दि.१८) सकाळी १० वाजतापासून सुरूवात झाली. सर्व काही सुरळीतपणे सुरू असताना जि.प.सदस्य विठोबा लिल्हारे यांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जि.प.मध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी थेट शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले यांचे कक्ष गाठले. तेव्हा कक्षात सभापती अंबुले उपस्थित नव्हते. त्यांनी थेट सभापती यांच्या टेबलावरच ठाण मांडले.कक्षातील कर्मचारी सुध्दा या प्रकाराने काही क्षण अवाक झाले.

ठळक मुद्देउपाध्यक्षांच्या मध्यस्तीनंतर आंदोलन मागे । कामे वाटप करताना विश्वासात घेतले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागरा जि.प.क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य विठोबा लिल्हारे यांनी त्यांच्या क्षेत्रात मंजूर करण्यात आलेली कामे वाटप करताना आरोग्य व शिक्षण सभापती यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरुन आपल्याला डावलल्याचा आरोप करीत शनिवारी (दि.१८) जि.प.तील त्यांच्या टेबलावरच ठाण मांडून जवळपास दोन तास ठिय्या आंदोलन केले. यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली होती. एखाद्या जि.प.सदस्याने अशा प्रकारचे आंदोलन प्रथमच केल्याचे बोलल्या जाते.जिल्हा परिषदेच्या दैनदिन कामाला शनिवारी (दि.१८) सकाळी १० वाजतापासून सुरूवात झाली. सर्व काही सुरळीतपणे सुरू असताना जि.प.सदस्य विठोबा लिल्हारे यांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जि.प.मध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी थेट शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले यांचे कक्ष गाठले. तेव्हा कक्षात सभापती अंबुले उपस्थित नव्हते. त्यांनी थेट सभापती यांच्या टेबलावरच ठाण मांडले.कक्षातील कर्मचारी सुध्दा या प्रकाराने काही क्षण अवाक झाले. मात्र त्यांना टेबलावर का बसले हे विचारण्याचे धाडस कर्मचाऱ्यांनी केले नाही. दरम्यान या प्रकाराची माहिती जि.प.च्या इमारतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती झाली. यानंतर अनेकांनी सभापतींच्या कक्षाकडे धाव घेतली. विठोबा लिल्हारे यांना हे आंदोलन कशासाठी करीत आहात अशी विचारणा केल्यावर त्यांनी जि.प.शिक्षण व आरोग्य विभागातर्फे आपल्या जि.प.क्षेत्रात ३५ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली.तसेच या कामांचे वाटप करण्यात आले. एका माजी आमदाराच्या सांगण्यावरुन यापैकी एकही काम आपल्याला विश्वासात न घेता वाटप करण्यात आले. हा आपल्यावर अन्याय असून याचा विरोध करण्यासाठी आपण हे ठिय्या आंदोलन करीत असल्याचे सांगितले. अनेकांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. दरम्यान जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हामिद, राष्टÑवादी काँग्रेसचे गटनेते गंगाधर परशुरामकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी विठोबा लिल्हारे यांची समजूत काढली. तसेच सोमवारपर्यंत त्यांच्या मागणीवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.यासंदर्भात शिक्षण सभापती रमेश अंबुले यांच्याशी संपर्क साधला असता मागील आठ दिवसापासून लिल्हारे हे आपल्याकडे कामाच्या पत्राची मागणी करीत होते. मात्र हे काम बांधकाम विभाग आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत केली जात आहे. त्यामुळे ती कामे देणे आपल्या अधिकार क्षेत्रात नसल्याचे सांगितले. तसेच लिल्हारे यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे सांगितले.जि.प.शिक्षण व आरोग्य विभागातंर्गत आपल्या क्षेत्रात ३५ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली. मात्र ही कामे वाटप करताना आपल्याला विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळेच आपण ठिय्या आंदोलन केले. जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ हमीद आणि जिल्हाध्यक्ष पुरूषोत्म कटरे यांनी सोमवारपर्यंत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घेतले.- विठोबा लिल्हारे, जि.प.सदस्य.

टॅग्स :zpजिल्हा परिषद