शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आई व पत्नीच्या मारेकऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST

राजेश शालिकराम गजभिये (३७,रा.सुपलीपार) याने २४ ऑक्टोबर रोजी लोखंडी साबळीने आई आनंद उर्फ सुनंदा शालिकराम गजभिये हिच्या डोक्यावर साबळीने मारुन तसेच पत्नी पुनम राजेश गजभिये हिचा स्लॅक्सने गळा आवळून व नंतर सब्बलने डोक्यावर मारुन खून केला होता. त्यानंतर स्वत:ची मोटारसायकल घेवून पसार तो झाला.

ठळक मुद्देसुपलीपार येथील प्र्रकरण : छत्तीसगडच्या महासमुंद येथून अटक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आई व पत्नीला माहित न करता दिड लाख रुपये कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड दिवाळीपर्यंत करणार असे ठणकावून सांगितले होते. परंतु दिवाळीपर्यंत पैशांची व्यवस्था होणार नाही आणि कर्ज देणारा घरी येईल या भितीपोटी स्वत:च्या आई व पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आमगाव तालुक्यातील ग्राम सुपलीपार येथे २४ ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेतील आरोपीला १५ दिवसानंतर छत्तीसगडच्या महासमुंद येथून गुरूवारी (दि.७) पहाटे ४.२३ वाजता अटक केली.राजेश शालिकराम गजभिये (३७,रा.सुपलीपार) याने २४ ऑक्टोबर रोजी लोखंडी साबळीने आई आनंद उर्फ सुनंदा शालिकराम गजभिये हिच्या डोक्यावर साबळीने मारुन तसेच पत्नी पुनम राजेश गजभिये हिचा स्लॅक्सने गळा आवळून व नंतर सब्बलने डोक्यावर मारुन खून केला होता. त्यानंतर स्वत:ची मोटारसायकल घेवून पसार तो झाला. त्याची मोटारसायकल मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील किरनापुर येथे आढळली होती. एकाच कुटुंबातील दोघांचा खून झाल्यामुळे या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांना अगत्याचे होते.सतत १५ दिवस जागून सुगावा लावण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड अशा तीन राज्याच्या सीमेत पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.त्यात १५ दिवसानंतर गुरूवारी (दि.७) छत्तीसड राज्यातील महासमुंद येथून आरोपी राजेश गजभिये (३७) याला अटक करण्यात आली.अंगावर असलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या भितीतून त्याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक संजय सिंह, बलराज लांजेवार, कटरे, सुर्यवंशी यांनी केली. आरोपीला सोमवारपर्यंत (दि.११) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Murderखून