शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

७२ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

By admin | Updated: October 15, 2014 23:19 IST

गोंदिया, तिरोडा, आमगाव आणि अर्जुनी मोरगाव या चारही विधानसभा मतदार संघांमध्ये बुधवारी शांततेत मतदान पार पडले. चारही मतदार संघातील एकूण ५४ उमेदवारांचे भवितव्य या मतदानाने यंत्रबद्ध झाले.

प्रचंड उत्सुकता : ५४ उमेदवारांचे भाग्य यंत्रबध्द, तीन गावातील नागरिकांचा मात्र बहिष्कारगोंदिया : गोंदिया, तिरोडा, आमगाव आणि अर्जुनी मोरगाव या चारही विधानसभा मतदार संघांमध्ये बुधवारी शांततेत मतदान पार पडले. चारही मतदार संघातील एकूण ५४ उमेदवारांचे भवितव्य या मतदानाने यंत्रबद्ध झाले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपेक्षाही यावेळी मतदानाचे प्रमाण वाढले आहे. सरासरी ७४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आमगाव या नक्षलप्रभावित मतदार संघात मतदानासाठी दुपारी ३ पर्यंतची मर्यादा होती. असे असतानाही तिथे ७० टक्केपेक्षा जास्त मतदान झाले आहे. यादरम्यान कुठेही कोणती अनुचित घटना घडलेली नाही. मात्र गोंदिया शहरात फुलचूर येथील मतदान केंद्र क्रमांक २९९ वर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये थोडी हाणामारी झाली. यात एकजण जखमी झाला. मतदारांना पैसे वाटण्यास मज्जाव केल्याने एका युवकाला मारहाण झाल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. जिल्ह्यातील तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव या मतदार संघातील तीन गावांतील नागरिकांनी वेगवेगळ्या कारणांसाठी मतदानावर बहिष्कार टाकला.सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरूवात झाली. ८ वाजतानंतर मतदान जोरात सुरू झाले. सकाळी ११ वाजतानंतर महिला उमेदवारांची संख्या वाढली होती. दुपारीनंतर ही गर्दी वाढली. सायंकाळी ६ वाजता रांगेत असलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी पात्र ठरविले. त्यामुळे अनेक ठिकाणी सायंकाळी ७ ते ७.३० वाजेपर्यंत मतदान सुरू होते.गोंदिया शहराच्या गोविंदपूर, छोटा गोंदिया, फुलचूर आणि सिव्हील लाईन या भागात सायंकाळी मतदानासाठी गर्दी वाढली होती. गोविंदपूर येथील मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे निवडणूक निरीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.मतदार उत्साहात, यंत्रणा टेन्शनमध्येगोंदिया शहरासह ग्रामीण भागात मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आला. त्यामुळे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील ७३.१२ टक्के मतदानापेक्षा यावेळी टक्केवारी वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.गोंदिया शहरात सर्वाधिक उत्साह आणि मतदारांची गर्दी गोविंदपूर भागातील मतदान केंद्रांवर होती. मनोहर म्युनिसिपल हायस्कूल या केंद्रावर सकाळपासून मदारांच्या रांगा लागल्या होत्या. यात महिलांची गर्दी लक्षणीय होती. त्यामुळे या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला. मात्र महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवला.मतदारांमध्ये असलेली चुरस पाहता गोंदियातील उमेदवार गोपालदास अग्रवाल, विनोद अग्रवाल, अशोक गुप्ता यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांनी विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली.गोंदिया विधानसभा मतदार संघातील संवेदनशील २१ आणि आमगाव विधानसभा मतदार संघातील उपद्रवी असलेल्या २१ मतदान केंद्रावर इंडो-तिबेटीयन बॉर्डर फोर्सचे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले होते.काही मतदान केंद्राबाहेर मतदारांना गुपचूप पैसे वाटप करण्याचे प्रकार घडले. गोंदियातील एका केंद्रावर अशा पद्धतीने पैसे वाटप करणाऱ्याकडून १० हजार रुपये जप्त करण्यात आले. मात्र पोलिसांत त्याबाबतची नोंद नव्हती. सोबतच मतदारांना राजकीय पक्षांकडून चिठ्ठ्या दिल्या जात होत्या.