शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात मोबाइल चोरी करणारी टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST

गोंदिया : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाइल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. मागील दोन दिवसांत चौघांचे सात मोबाइल ...

गोंदिया : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाइल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. मागील दोन दिवसांत चौघांचे सात मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार गोंदिया शहर पोलिसांनी नोंदविली आहे. पळविण्यात आलेले हे सात मोबाइल १ लाख १४ हजार ९९० रुपये किमतीचे आहेत. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

शहराच्या मामा चौकातील मोसीम वल्द शफी शेख (३२) यांच्या घरातून २९ जानेवारीच्या सकाळी ८ वाजता १७ हजार रुपयांचे दोन मोबाइल पळविण्यात आले. विवेकानंद कॉलनी, सिव्हिल लाइन, गोंदिया येथील चैतन्य प्रकाश राहांगडाले (२९) यांच्या घरातील हॉलमध्ये टेबलवर ठेवलेले ५३ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल अज्ञात आरोपींनी २८ जानेवारीच्या सकाळी ९.३० दरम्यान पळवून नेले. तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तिसरी चोरीची घटना कुंभारेनगर, गोंदिया येथील आहे. कुंभारेनगरातील नितेश केशोराव डोंगरे (३९) यांच्या घरी हॉलमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल २९ जानेवारीच्या सकाळी ८ वाजता चोरी करण्यात आले. चौथी चोरी माताटोली शक्कर धर्मशाळा, गोंदिया येथील गुलशन परमानंद नागदेव (३८) यांच्या घरातून टेबलावर ठेवलेला १९ हजार ९९० रुपये किमतीचा मोबाइल अज्ञात चोरट्यांनी पळविला. ही घटना २९ जानेवारीच्या सकाळी ८ च्या दरम्यान घडली. गोंदिया शहर पोलिसांनी या घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नायक योगेश बिसेन करीत आहेत.