शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्ती सुधार योजनेचा दुरूपयोग

By admin | Updated: May 30, 2014 00:11 IST

अनुसूचित जाती व व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाकडून कटंगीकला ग्रामपंचायतला सौर ऊज्रेवर चालणारे १0 पथदिवे मिळाले.

गोंदिया : अनुसूचित जाती व व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाकडून कटंगीकला ग्रामपंचायतला सौर ऊज्रेवर चालणारे १0 पथदिवे मिळाले. मात्र या पथदिव्यांना दलित वस्तीत न लावता तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांच्या घरासमोर लावण्यात आले आहे. हा दलित वस्तीच्या सुधारणेसाठी मिळणार्‍या निधीचा दुरूपयोग आहे, असा आरोप माजी सरपंच, विद्यमान ग्रा.पं. सदस्यासह गावकर्‍यांनी केला आहे. प्राप्त माहितीनुसार, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास या योजनेचे पूर्वीचे नाव दलित वस्ती सुधार योजना होते. या योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाचे आयुक्त यांच्या आदेशान्वये १८ फेब्रुवारी २0१४ रोजी पुरविलेले १0 सौर पथदिवे चांगल्या स्थितीत असल्याने कटंगीकला ग्रामपंचायतने स्वीकारले. या कटंगीकलाच्या सरपंचाने वार्ड-३ व वार्ड-४ येथे दलित वस्तीच्या योग्य ठिकाणी सौर पथदिवे न लावता ग्रामपंचायत सदस्यांच्या हितासाठी व गैरवापरासाठी लावून दिले.  हे कृत्य जनताविरोधी व शासन फसवणुकीचे असल्याचे आरोप माजी सरपंच पुरूषोत्तम राऊत व ग्रा.पं. सदस्य अनिल तिराले यांनी केले आहेत. कटंगीकला येथील काही ग्रा.पं. सदस्य दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मिळालेल्या सौर पथदिव्यांना दलित वस्तीमध्येच लावण्यात यावे, अशी मागणी करीत आहेत. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांच्या घरासमोर बेकायदेशीरपणे व स्वत:च्या मनमर्जीने सौर पथदिवे लावण्यात आले आहेत.शासनाच्या योजनेचा लाभ जनतेला न मिळता लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनीच बळकावला. त्यांनी आपापल्या घरासमोरच सदर पथदिवे लावले. या गैरकृत्यासाठी सरपंच व काही सदस्य जबाबदार असून त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व दलित वस्ती सुधार योजनेचा लाभ दलितांना देण्यात यावा, अशी मागणी कटंगीकला वासीयांनी केली आहे. याशिवाय सरपंच, उपसरपंच व सचिव ग्रामस्थांना विविध योजनांचा फायदा मिळू देत नाही. योजनांचा लाभ ते केवळ आपल्या पसंतीच्याच लोकांना देत आहेत. सामाजिक वनीकरणची कार्ये उपसरपंच यांच्या पत्नीला देण्यात आली आहेत. शिवाय ग्रामपंचायतीच्या कामांची ठेकेदारी येथील ग्रामपंचायत सदस्यच करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या सर्व प्रकरणांची योग्य चौकशी करून त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच पुरूषोत्तम राऊत, ग्रामपंचायत सदस्य अनिल तिराले, राजूसिंह बैस, प्रतिभा डोंगरवार, विनोद वर्‍हाडे, मुरलीधर बावणकर, किर्ती राऊत, रेवन चव्हाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)