शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलचे कोविड केअर सेंटर भगवान भरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

कोरोना बाधित रुग्णांना शहरातील विविध चार कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.अधिक गंभीर असलेल्या रुग्णांना मेडिकलमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. या ठिकाणी दाखल रुग्णांवर वेळीच उपचार आणि सोयी सुविधा मिळण्याची गरज आहे. पण प्रत्यक्षात तसे काहीच होत नसल्याचे चित्र आहे. रुग्णांना दाखल केल्यानंतर वेळेत औषधे, पोष्टीक जेवण, पिण्याचे शुध्द पाणी, स्वच्छ ब्लाँकेट व चादरी देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा अजब कारभार

रुग्णांना साधे पाणी मिळेना : इम्युनिट वाढविणाऱ्या गोळ्या खा आणि रहालोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना बाधित गंभीर असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. मात्र येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना साधे पाणी सुध्दा मिळत नसल्याची बाब पुढे आली. येथे दाखल असलेल्या रुग्णांना केवळ इम्युनिटी वाढविणाऱ्या चार गोळ्या खा आणि राहा ऐवढेच उपचार केले जात आहे.त्यामुळे मेडिकलचे कोविड केअर सेंटर भगवान भरोसे असून दिव्याखालीच अंधार असल्याची स्थिती आहे.कोरोना बाधित रुग्णांना शहरातील विविध चार कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.अधिक गंभीर असलेल्या रुग्णांना मेडिकलमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. या ठिकाणी दाखल रुग्णांवर वेळीच उपचार आणि सोयी सुविधा मिळण्याची गरज आहे. पण प्रत्यक्षात तसे काहीच होत नसल्याचे चित्र आहे. रुग्णांना दाखल केल्यानंतर वेळेत औषधे, पोष्टीक जेवण, पिण्याचे शुध्द पाणी, स्वच्छ ब्लाँकेट व चादरी देण्याची गरज आहे. एखाद्या रुग्णाला छातीत दुखत असेल तर त्याची वेळीच तपासणी करुन उपचार होणे गरजेचे आहे. पण मेडिकलमधील कोविड केअर सेंटरमध्ये या सर्व सुविधांचा अभाव आहे. रुग्णांना साधे पिण्याचे पाणी मिळत नसेल तर बाकी सुविधांचा विचार न केलेला बरा अशी स्थिती आहे. ब्लाँकेट आणि चादरींची अवस्था पाहिली तर रुग्ण बरा होण्याऐवजी आजारी पडेल अशी स्थिती आहे. दिवसभरात रुग्णांची नियमित तपासणी सुध्दा होत नसल्याचे येथे दाखल असलेल्या एका रुग्णांने सांगितले. केवळ इम्युनिटी वाढविणाऱ्या चार गोळ्या खा आणि येथे राहा अशीच अवस्था येथील कोविड केअर सेंटरची आहे. पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटरमधील सोयी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी स्वत:च्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. प्रत्येक केंद्रासमोर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी स्टॉफची माहिती असलेले फलक लावण्याचे निर्देश दिले. पण मेडिकलच्या कोविड केअर सेंटरमध्येच माहिती फलक लागलेले नाही. दिव्याखालीच अंधार असल्याची स्थिती आहे.बायो मेडिकल वेस्टचा खचशहरातील फुलचूर परिसरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमधून दररोज निघणाºया बायो मेडिकल वेस्टची (जैविक कचरा) नियमित विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी या केंद्राच्या आतील भागात बायो मेडिकल वेस्टचा खच पडला आहे. परिणामी यापासूनच अधिक संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण याकडे कुणाचेही लक्ष नाही.

कोरोना बाधितांचा मृतदेह उघड्यावरचदोन दिवसांपूर्वीच मेडिकलमधील कोविड केअर सेंटरमधील दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार प्लास्टिकमध्ये पॅक ठेवण्याची गरज आहे. मात्र हे दोन्ही मृतदेह कोविड केअर सेंटरच्या परिसरात दोन तीन तास तसेच उघड्यावर पडले होते. यामुळे येथे दाखल असलेल्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.असुविधांमुळेच तपासणीकडे दुर्लक्षकोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. यात बऱ्याच जणांना लक्षणे दिसल्यानंतरही ते तपासणी करण्यासाठी जात नाही. कारण कोविड केअर सेंटरमधील असुविधांचा बोजवारा आणि आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष याच गोष्टी कारणीभूत ठरत आहे.तर यासाठी तयार केलेले टास्क फोर्स आणि समिती केवळ नाममात्र ठरत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या