शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

चना हुरड्याने दिला अनेकांना रोजगार

By admin | Updated: December 24, 2015 02:23 IST

थंडीचा जोर जसजसा वाढत आहे तसतसा शेतातील चना बाजारात येऊ लागला आहे. भाजलेल्या चन्याचा हुरडा खवय्यांना खुणावत आहे.

बाराभाटी : थंडीचा जोर जसजसा वाढत आहे तसतसा शेतातील चना बाजारात येऊ लागला आहे. भाजलेल्या चन्याचा हुरडा खवय्यांना खुणावत आहे. ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला भाजलेला चना घेऊन बसणाऱ्या लोकांसाठी काही दिवसांकरिता मिळणारा हा रोजगार त्यांना दिलासा देणारा ठरत आहे. जिभेचे चोचले पुरविण्यासोबतच अनेक नागरिक ओला चना (सोले), तर काही भाजलेले चन्याचे गाठे टाईमपास म्हणून आवडीने खातात. चन्याचा हा हुरडा विक्रीसाठी शहरी भागासोबत गावोगावी उपलब्ध होत आहे. यातून अनेकांना काही दिवसांसाठी का असेना, चार पैसे कमविण्याची संधी मिळत आहे. खरीप हंगाम संपला की अनेक भागात रोजगाराची समस्या निर्माण होते. त्यामुळे अनेकांना रोजगाराचे नवीन साधन हवे असते. त्यामुळे अनेक नागरिकांसाठी रेल्वे, बसस्थानक, बाजारपेठ आणि इतरत्र हरभऱ्यापासून भाजून मिळणारा हुरडा आज नागरिकांना रोजगार देत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात अनेक वर्षापासून एमआयडीसी रिकामी पडलेली आहे. त्यापासून मिळणारा रोजगार मात्र मिळत नाही. शासनाची रोजगार हमी योजना नशिबावरच अवलंबून आहे. मिळाली तर तिची मजुरी ३-४ महिन्यानंतर मिळते. त्यामुळे नागरिकांना नानाविध कामधंदा करून पोटाची खळगी भरावी लागत आहे. चना-हुरड्यासारखा रोजगार शोधत रेल्वेमधूनही हा व्यवसाय केला जातो. (वार्ताहर)