शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

माणूस प्रज्ञावंत व शीलवान असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

शिकल्याशिवाय उपाय नाही. माणसाने प्रज्ञावंत व शीलवंत बनून चारित्र्यसंपन्न जीवन जगून समाजाच्या उद्धारासाठी जागरूक असावे असे प्रतिपादन लाखांदूर येथील बहुजन प्रबोधन मंचचे अध्यक्ष अनिल कानेकर यांनी केले.

ठळक मुद्देअनिल कानेकर : वैशालीनगरात गौतम बुद्ध मूर्ती अनावरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : आंबेडकरी जनतेने नेत्यांच्या मागे न धावता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारून शिका, संघटित व्हा व पर्यायाने संघर्षासाठी तयार रहावे. शिकल्याशिवाय उपाय नाही. माणसाने प्रज्ञावंत व शीलवंत बनून चारित्र्यसंपन्न जीवन जगून समाजाच्या उद्धारासाठी जागरूक असावे असे प्रतिपादन लाखांदूर येथील बहुजन प्रबोधन मंचचे अध्यक्ष अनिल कानेकर यांनी केले.तालुक्यातील इटखेडा येथील वैशालीनगरात समता बौद्ध समाजाच्यावतीने आयोजित तथागत गौतम बुद्ध मूर्ती अनावरण सोहळ््यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन आमदार मनोहर चंद्रिकापुरे व माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक संजय मगर, माजी प्राचार्य उद्धव रंगारी, श्रावण भानारकर तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य आशा झिलपे, उमाकांत ढेंगे, उद्धव मेहेंदळे, अभिमन्यू लोणारे, इंद्रदास झिलपे, चेतन शेंडे, ग्रामपंचायत सदस्य कल्पना लोणारे, लक्ष्मण माटे, मूर्तीकार श्रीधर सावरकर, संतोष रोकडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यक्र माच्या सुरुवातीला गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मॉ जिजाऊ यांच्या छायाचित्रांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रा. मगर यांनी, आज आपण अत्यंत विपरीत व विसंगत जीवनाकडे प्रवेश करीत आहोत. या देशातील ४-५ टक्के लोकांकडे देशाची ८० टक्के संपत्ती आहे. मानव जातीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले विचार व गौतम बुद्ध यांची अहिंसा अंगीकारून जीवन जगावे असे मत व्यक्त केले. रंंगारी यांनी, आजची तरु ण पिढी व्यसनाकडे वळत आहे. त्यांनी व्यसनापासून दूर राहून अभ्यासाकडे वाढावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या विचारसरणीचा अंगिकार करून पर्यायाने समाजाच्या हितासाठी कार्य करावे असे मत व्यक्त केले. आमदार चंद्रिकापुरे यांनी, समाजाने बुद्धाच्या पंचशील तत्वांचे पालन करावे असे सांगीतले.प्रास्ताविक मनोज लोणारे यांनी मांडले. संचालन मोरेश्वर गोंडाने यांनी केले. आभार दिनेश वासनिक यांनी मानले. कार्यक्रमासाठी समता बौद्ध समाजाचे कोषाध्यक्ष सुरेश देशपांडे, अध्यक्ष गुणाजी ढोके, उपाध्यक्ष अनिल मेश्राम, सचिव सिद्धार्थ डोंगरे, सहसचिव उल्हास वासनिक व इतर समाजबांधवांनी सहकार्य केले.मूर्तीकार व दानदात्यांचा सत्कारया कार्यक्रमात मूर्तीकार श्रीधर सावरकर यांना बौद्ध समाजाच्यावतीने ‘बुद्ध हिच धम्म’ तर मूर्तीदानदाता कल्पना लोणारे यांना आंबेडकरी चळवळीतील ‘दशा व दिशा’ हा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच रात्री भाऊसाहेब कव्वाल यांचा समाजप्रबोधनाचा कार्यक्र म घेण्यात आला.