शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

भवभूतींचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे

By admin | Updated: February 5, 2016 01:17 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब देवरस यांचे समरसतेचे कार्य भवभूती शिक्षण संस्था पुढे नेत आहे, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.

पालकमंत्री बडोले : संघी टॉपर्स अवॉर्डचे वितरणआमगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब देवरस यांचे समरसतेचे कार्य भवभूती शिक्षण संस्था पुढे नेत आहे, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. महाकवी भवभूतींच्या जीवनाबद्दल लोकांना माहिती व्हावी यासाठी संस्थेने विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. स्व.लक्ष्मणराव मानकर गुरूजी जयंती समारंभात गुरूवारी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अप्पाजी स्वामी (तामिळनाडू) होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला आदर्श विद्यालयातील गुरूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. तसे महाकवी भवभूतीच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यानंतर अतिथींनी मेजर ध्यानचंद क्रीडागृहाचे लोकार्पण केले. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, गडचिरोलीचे खा.अशोक नेते, भाजप प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर, आ.संजय पुराम, आ.विजय रहांगडाले, फुलबन मानकर, संस्थेचे कार्यवाह माजी आ.केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेश असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी अतिथींचा संस्थेचे कार्यवाह, अध्यक्ष व संचालक मंडळाने स्मृतिचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रास्ताविक व अहवाल वाचन कार्यवाह केशवराव मानकर यांनी केले. यावेळी गुरूजींसोबत काम करणारे कार्यकर्ते नत्थुलाल ठाकुर, प्रेमलाल चौधरी, बाबुलाल अग्रवाल, मोतीलाल कुकरेजा, बाबुलाल उपराडे, प्रेमलाल बोपचे यांचा स्मृतिचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. संघी परिवारातर्फे आमगाव तालुक्यात प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संघी टॉपर्स अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला. संयोजक प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमात फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.दिलीप संघी, आदर्श विद्यालयाचे प्राचार्य जी.आर. मच्छिरके, रामकृष्ण विद्यालयाचे प्राचार्य दिनेश राऊत, रविंद्र विद्यालयाचे प्राचार्य के.ए.हुकरे, पॉलीटेक्नीकचे प्राचार्य संदीप हनुवते, बी.एड.चे प्रभारी जयंत बन्सोड, डी.एड.च्या प्राचार्या सहुल, के.के.इंग्लिश प्राथमिकच्या प्राचार्या रहांगडाले, आदर्श वाचनालयाचे अध्यक्ष बालाप्रसाद दुबे, भवभूती पतसंस्थेचे अध्यक्ष झेड.एस.बोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)१६७ रक्तदात्यांचा केला गौरवजयंती समारोहाच्या निमित्ताने आदर्श वाचनालय, भवभूती महाविद्यालय, मानकर ग्रुप आॅफ इन्स्टीट्युट्स इत्यादी स्थानांवर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात १६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.