शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; घोषणाबाज सरकारला जनताच धडा शिकविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

निवडणूक प्रचारार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव, माहुरकुडा जि.प.क्षेत्रात बुधवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भागवत नाकाडे,आनंद जांभुळकर, गिरीश पालीवाल, यशवंत गणविर, आर.के.जांभुळकर, दीपक सोनवाने व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : महागाव, माहुरकुडा जि.प.क्षेत्रात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : खोटेही बोलायचे मात्र ते सुध्दा रेटून बोलायचे असेच धोरण भाजप सरकारचे आहे. पाच वर्षांपूर्वी सत्तेवर येण्यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारने आम्ही सत्तेवर आल्यास जनतेच्या मनातील भारत साकारु असे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, महागाई आटोक्यात आणू अशा मोठा मोठा घोषणा केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात चित्र याविरुध्द चित्र आहे. मागील पाच वर्षांत केवळ घोषणांचाच पाऊस पडला बाकी काहीच झाले नाही. त्यामुळे घोषणाबाज सरकारला जनताच आता मतपेटीतून धडा शिकविणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.निवडणूक प्रचारार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव, माहुरकुडा जि.प.क्षेत्रात बुधवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भागवत नाकाडे,आनंद जांभुळकर, गिरीश पालीवाल, यशवंत गणविर, आर.के.जांभुळकर, दीपक सोनवाने व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले, विकासाच्या नावावर थापा मारणाऱ्या भाजप सरकारने मागील पाच वर्षांत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात कोणती विकास कामे केली ते सांगावे.केवळ नाल्याबांधून विकास होत नाही. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जुनी येथे राईस पार्क स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा सुध्दा हवतेच विरली. सत्तेवर येण्यापूर्वी धानाला ३ हजार रुपये प्रती क्विंटल हमीभाव देऊ अशी घोषणा केली होती. मात्र सत्तेवर येताच या घोषणेचा सुध्दा भाजप सरकारला विसर पडला. तर लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव दिला. यावरुन घोषणबाजी करणारे कोण आणि शेतकºयांचे हितेशी कोण हे जनतेने चांगले ओळखले आहे. तर कोट्यवधी रुपयांच्या महामार्ग तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.मात्र त्या कामांना सुध्दा अद्यापही सुरूवात झाली नाही.मागील दहा वर्षांत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास पूर्णपणे खुंटला आहे.तर शेतकरी, शेतमजूर,कामगार आणि सर्वसामान्य नागरिक सुध्दा खूश नाही.या क्षेत्रात बेरोजगारांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांना रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागत आहे.आरोग्य, शिक्षण या क्षेत्राची स्थिती सुध्दा जैसे थे आहे.भाजप लोकप्रतिनिधीच्या नेतृत्त्वात या विधानसभा क्षेत्रात एकही उल्लेखनिय काम झाले नसल्याचा आरोप चंद्रिकापूरे यांनी केला. या क्षेत्राचा कायापालट आणि विकास केवळ आघाडी सरकारच करु शकते असे सांगत यासाठी जनतेची साथ हवी असल्याचे सांगितले.