शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; निवडणुकीसाठी गोंदिया आगारच्या ४१ बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान घेतले जाणार आहे. जिल्ह्यातील एकू ण १२८२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी येथून या सर्वच मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्य पाठविले जाईल.

ठळक मुद्देसंडे अँकर । गोंदिया एसडीओंना २६ : देवरी एसडीओंना दिल्या १५ बसेस

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकी अंतर्गत सोमवारी (दि.२१) मतदान घेतले जाणार असून मतदान साहित्य घेऊन केंद्रांवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गोंदिया आगारच्या ४१ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यात, गोंदिया उपविभागीय अधिकाऱ्यांना २६ तर देवरी उपविभागीय अधिकाऱ्यांना १५ बसेस दिल्या जाणार आहेत. रविवारी (दि.२०) सकाळी १० वाजता आगाराकडून त्यांना या बसेस दिल्या जाणार आहेत.विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान घेतले जाणार आहे. जिल्ह्यातील एकू ण १२८२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी येथून या सर्वच मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्य पाठविले जाईल.इलेक्शन ड्युटीवरील कर्मचारी हे साहित्य घेऊन जाणार व मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी हे साहित्य संबंधित तालुकास्थळी जमा करतील. अशात कर्मचारी व निवडणूक साहित्याची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मागविल्या जातात. या बसेस कर्मचाºयांना साहित्यासह त्यांच्या मतदान केंद्रावर सोडून देतील.यानुसार, गोंदिया आगाराने निवडणुकीसाठी ४१ बसेसचे नियोजन केले आहे. यातील, २६ बसेस गोंदिया उपविभागीय अधिकाऱ्यांना तर १५ बसेस देवरी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या जाणार आहेत.रविवारी (दि.२०) सकाळी १० वाजता या बसेस येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे तर देवरी येथील आयटीआयमध्ये लावायच्या असून तेथून निवडणूक साहित्य घेऊन कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर सोडून बसेस परत येतील. तसेच मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतर सोमवारी (दि.२१) सायंकाळी कर्मचाऱ्यांना साहित्यासह केंद्रांवरून घेणार व साहित्य जमा केल्यावर कर्मचाऱ्यांना सोडून बसेस आगारात परतणार आहेत.१९ हजार रूपये प्रती बस मागणीगोंदिया आगाराकडून देण्यात येणाऱ्या या ४१ बसेससाठी आगाराकडून प्रती बस १९ हजार रूपयांची मागणी करण्यात आली आहे. मात्र आगाराला अद्याप पैसा मिळालेला नाही. विशेष म्हणजे,सन २०१५ मधील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लावण्यात आलेल्या बसेसचेही पैसे अद्याप आगाराला मिळाले नसल्याची माहिती आहे.तिरोडा व अर्जुनी-मोरगावसाठी भंडारा आगाराच्या बसेसगोंदिया आगाराकडून गोंदिया व आमगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी ४१ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तर तिरोडा व अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी तिरोडा, भंडारा व पवनी आगारातून बसेस पाठविल्या जाणार आहेत.

 

टॅग्स :gondiya-acगोंदियाstate transportएसटी