शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

चार स्थायी व दोन आमसभांना खो

By admin | Updated: December 23, 2015 02:17 IST

दर महिन्यात स्थायी समिती व दर दोन महिन्यांत आमसभा घेणे बंधनकारक असताना नगर परिषदेने चक्क चार स्थायी समिती व दोन आमसभांना खो दिला आहे.

विकासकामे प्रभावित : गोंदिया नगर परिषदेत नियमांना बगलगोंदिया : दर महिन्यात स्थायी समिती व दर दोन महिन्यांत आमसभा घेणे बंधनकारक असताना नगर परिषदेने चक्क चार स्थायी समिती व दोन आमसभांना खो दिला आहे. शहरातील विविध विकासकामांसाठी स्थायी समिती व आमसभेची मंजूरी आवश्यक असताना हा बेजबाबदार प्रकार पालिकेत घडत आहे. याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होत आहे. न.प.चा कार्यकाळ संपण्यासाठी जेमतेम एक वर्ष शिल्लक असताना सुरू असलेल्या या कारभारामुळे विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय कामांत सत्ताधारी फेल ठरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. नगर परिषद अधिनियम १९६५ कलम ८२ अन्वये पालिकेची आमसभा दर दोन महिन्यांत घेणे बंधनकारक आहे. अध्यक्षांच्या मागणीवरून ही आमसभा बोलाविली जाते. सभेची विषय सूची अध्यक्ष तयार करतात. यामुळे वेळेवर आमसभा घेणे ही एक प्रकारे अध्यक्षांचीच जबाबदारी आहे.शिवाय दर महिन्याला स्थायी समितीची सभा बोलावणे बंधनकारक आहे. मात्र येथे १० आॅगस्ट रोजी स्थायी समितीची सभा झाल्यानंतर सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांतील स्थायी समितीची सभाच घेण्यात आली नसल्याची माहिती आहे. ११ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या आमसभेनंतर आॅक्टोबर व डिसेंबर महिन्यात आमसभा घेणे बंधनकारक होते. मात्र येथेही नियमांना धुडकाविण्यात आले. यामुळे शहरातील कित्येक विकासकामे रखडत चालली आहेत.स्थायी समितीच्या तीन सभा व एक आमसभा न घेणे ही काही साधारण नसतानाही पालिका प्रशासन मूग गिळून बसले आहे. (शहर प्रतिनिधी)