नागरिकांकडून होतेय ‘लॉकडाऊन’चा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:00 AM2020-04-10T05:00:00+5:302020-04-10T05:00:20+5:30

मागील काही दिवसांपासून बँक ऑफ महाराष्ट्रची लिंक फेल होती व त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले होते. मात्र २ दिवसांच्या सुटीनंतर बँकेचे काम सुरू झाले. जनधन योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या खात्यात शासनाकडून रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे विड्रॉल करण्याकरिता महिलांनी बँकेत गर्दी केली होती.

'Lockdown' violates citizens | नागरिकांकडून होतेय ‘लॉकडाऊन’चा भंग

नागरिकांकडून होतेय ‘लॉकडाऊन’चा भंग

googlenewsNext
ठळक मुद्देबँकेसमोर एकच गर्दी : ‘सोशल डिस्टन्सिंग’चा उडाला फज्जा, पैसे काढण्याची लगबग

लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ आहे. मात्र नागरिक सर्रास ‘लॉकडाऊन’चा भंग करीत असल्याचे चित्र मंगळवारी येथील बॅक ऑफ महाराष्ट्रसमोर बघावयास मिळाले. नागरिकांकडूनच ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडविला जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्गाचा धोका वाढला आहे.
मागील काही दिवसांपासून बँक ऑफ महाराष्ट्रची लिंक फेल होती व त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले होते. मात्र २ दिवसांच्या सुटीनंतर बँकेचे काम सुरू झाले. जनधन योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या खात्यात शासनाकडून रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे विड्रॉल करण्याकरिता महिलांनी बँकेत गर्दी केली होती.
नियमानुसार बँकेने ग्राहकांसाठी आत प्रवेश करताना ‘सोशल डिस्टन्सिंगचे’ पालन करून एका-एका व्यक्तीला प्रवेश दिला जात होता. मात्र बँकेच्या गेटजवळ व बाहेर उभ्या ग्राहकांनी नियमांची पायमल्ली केल्याचे चित्र दिसून येत होते. आपले काम लवकर व्हावे यासाठी ग्राहकांनी जवळ-जवळ उभे राहून गर्दी केली होती.
त्यामुळे ‘लॉकडाऊन’ व ‘सोशल डिस्टन्सिंग’चा सर्रास भंग होत असल्याचे चित्र पहायला मिळाले. बँक कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता ग्राहकांना समजवून सांगितल्यानंतरही ते ऐकत नसल्याचे सांगितले.

ग्रामपंचायतने केली व्यवस्था
ग्रामपंचायत साखरीटोलाच्यावतीने (सातगाव) येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन बँकेसमोर पेंडालची व्यवस्था करून नागरिकांना विशिष्ट अंतर ठेवावे जेणे करून कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेतली आहे. ठाणेदार राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनात येथे सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतन पालन व्हावे याकरिता पथक तयार करण्यात आले आहे.

Web Title: 'Lockdown' violates citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.