शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

कमी वीज दाबाने केला घात

By admin | Updated: April 12, 2017 01:17 IST

शेतकऱ्यांचे पुढारी आम्हीच म्हणणारे राजकीय नेते दिसेनासे झाले आहेत. १५ ते २० दिवसांपासून विजेचा लंपडाव व कमी दाब निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपत आहे.

शेतातील पीक करपले : शेतकऱ्यांचे अश्रू कुणीच पुसेनाअर्जुनी मोरगाव : शेतकऱ्यांचे पुढारी आम्हीच म्हणणारे राजकीय नेते दिसेनासे झाले आहेत. १५ ते २० दिवसांपासून विजेचा लंपडाव व कमी दाब निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपत आहे. पण ही बाब लक्षात न घेता वीज वितरण कंपनी सुध्दा डोळेझाक करीत असून अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्यावर कोणाचे ही वचप दिसून येत नाही. वीजेच्या या समस्येमुळे मात्र आपले करपत असलेले पीक बघून शेतकऱ्यांच्या डोळ््यात अश्रू येत आहेत. परिसरातील शेतशिवाराची झळा परिस्थिती खूप गंभीर आहे. विजेचा लंपडाव व कमी दाब निर्माण झाल्यामुळे पीक डोळयासमोर मरताना बघून शेतकरी रडू लागला आहे. देशाचा अन्नदाता म्हणून ओळखला जाणारा हा शेतकरी शासन व प्रशासनाला ‘असं अर्धमेलं जगण्यापेक्षा साहेब! एकदा कायमचे मारून तरी टाका, आमचे वीज कनेक्शन कापून टाका!’ असे सांगत आहे. कारण कमी दाबामुळे येथील शेतकऱ्यांचे वीज उपकरण जळाले असून त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आर्थिक नुकसान भरपाई मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची ताकत त्यांच्या अंगात राहीली नसून तो हवालदिल दिसत आहे. शासन शेतकऱ्यांना सतत १६ तास विज देण्यास असमर्थ ठरले आहे असे दिसून येत आहे. अनेक तांत्रीक कामाने दिवसभऱ्यातून ७-८ वेळा विज पुरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी भर उन्हात शेतकऱ्याला पायपीट करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. शेतीला पाहिजे तेवढे सिंचन होत नसल्याने पिके करपत आहे. त्याचप्रमाणे विहीरी व बोरवेलच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. पाण्याच्या उपसा कमी होतो व त्यातच विजेचा लंपडाव सुरू असतो त्यामुळे पिकांसाठी पूर्ण जमीन ओली होत नाही. परिणामी पीक करपत आहे, व काही शेतकऱ्यांना अर्धेच पीक होत आहे. त्यामुळे अर्ध्या पिकाची आशा शेतकऱ्यांनी सोडून दिली आहे. उत्पन्न घेण्यासाठी आलेला खर्चही त्यांना परतफेडीसाठी अडसर ठरत आहे. यातच अर्ध्या जमिनीचे येणारे पिकही सिंचनाअभावी पूर्णपणे कोमेजले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)पुढारी फक्त निवडणुकीपुरतेचविविध क्षेत्रातील शासकीय कर्मचारी वेतनाचा लाभ घेत असतानासुध्दा संपावर जाण्याचे चित्र आपल्याला वेळोवेळी पहायला मिळते. परंतु शेतकरी संपावर गेला अशी परिस्थिती कधी पहायला मिळत नाही. आजची स्थिती शेतीसाठी पूरक नाही. अन्नदात्याला फाशी लागण्याची वेळ ओढवली असून यामध्ये शेतकरी पार होरपळून निघाला आहे. शेतकऱ्यांचे कैवारी आम्हीच म्हणणारे पुढारी गाजावाजा करून आपले नाव करून घेतात. मात्र शेतकऱ्यांची ही स्थिती बघूनही आता कुणीच पुढे येत नाही. त्यामुळे पुढारी फक्त निवडणुकीतच दिसतात असे येथील शेतकरी बोलत आहेत.