शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या कोलांटउड्यांनी कार्यकर्त्यांची गोची

By admin | Updated: September 29, 2014 23:07 IST

विधानसभा निवडणुकीला आता खरा रंग चढत आहे. निवडणूक जसजशी जोमात येत आहे तसतशा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. इकडचे कार्यकर्ते तिकडे आणि तिकडचे इकडे खेचून प्रमुख पक्षांकडून आपली

गोंदिया : विधानसभा निवडणुकीला आता खरा रंग चढत आहे. निवडणूक जसजशी जोमात येत आहे तसतशा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. इकडचे कार्यकर्ते तिकडे आणि तिकडचे इकडे खेचून प्रमुख पक्षांकडून आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यात ज्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता जास्त, त्यांच्याकडे जाण्यास अनेक जण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे अनेक वर्षे ज्या पक्षाचा झेंडा घेऊन मिरवलो त्या पक्षाने तिकीट नाकारल्याने ऐन वेळी दुसऱ्या पक्षाच्या तिकीटवर मैदानात उतरलेल्या नेत्यांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली आहे. नवीन पक्षात काम करण्याची मानसिकता बनविणे त्यांच्यासाठी कठीण होत आहे. प्रत्यक्ष मतदानाला आता अवघे १५ दिवस उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांची धडधड वाढू लागली आहे. अशात आपले कार्यकर्ते वाढविण्यासाठी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळविण्याचे सत्र प्रमुख उमेदवारांकडून सुरू आहे. यात कार्यकर्तेसुद्धा आपल्या ‘भविष्या’चा विचार करून कोणाला साथ देणे जास्त फायदेशीर ठरेल याचा विचार करून भविष्याची दिशा निश्चित करताना दिसत आहे. यातूनच कार्यकर्त्यांची फुटा-फूट सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची यादी बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेनंतर निश्चित होईल. रिंगणात अनेक जण राहणार असले तरी प्रमुख राजकीय पक्षातील उमेदवारांतच लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या या युद्धात साम, दाम, दंड व भेद या अस्त्रांचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. निवडणूक म्हटली की यामध्ये मतदार व कार्यकर्ते या दोन गोष्टी अतिमहत्वाच्या आहेत. यामुळे आता मतदारांचा कल आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवार प्रचार सभा व भेटी-गाठींचे माध्यम अवलंबित आहेत. कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचून आपली ताकद वाढविण्यासोबतच इतरांना कमजोर करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षातून होत आहे. मात्र काही ठिकाणी कार्यकर्ते सुरक्षित भविष्याची चाहुल ओळखून स्वत:हून एखाद्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. काही अनुभवी उमेदवार राजकारणात रमलेले आहेत. यामुळे त्यांना हे कसब चांगलेच अवगत आहे. कार्यकर्ते आपल्या खेम्यात आल्यास त्यांची मतं तर मिळणारच, मात्र त्यांचा वापर करून त्यांच्या संपर्कातील अन्य मते सुद्धा खेचता येतील या उद्देशाने कार्यकर्त्यांमध्ये फुटा-फुटीचे राजकारण आता गाजू लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)