जमिनीचे भाव १५ टक्क्यांनी वाढले

By Admin | Updated: January 3, 2015 23:04 IST2015-01-03T23:04:58+5:302015-01-03T23:04:58+5:30

नवीन वर्ष उजाडताच जमिनीच्या सरकारी दरात वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार महागणार आहेत. गोंदिया शहरात ही वाढ १५ ते २० टक्के तर ग्रामीण

Land prices increased by 15 percent | जमिनीचे भाव १५ टक्क्यांनी वाढले

जमिनीचे भाव १५ टक्क्यांनी वाढले

गोंदिया : नवीन वर्ष उजाडताच जमिनीच्या सरकारी दरात वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार महागणार आहेत. गोंदिया शहरात ही वाढ १५ ते २० टक्के तर ग्रामीण भागात १० ते १५ टक्के वाढ करण्यात आली आहे.
दरवर्षी वर्षाच्या पहिल्या दिवसापासून रेडिरेकनरचे नवीन दर लागू केले जातात व दरवर्षी त्यात वाढ होत असते. यंदाही चित्र तेच आहे. मात्र गोंदिया नगर परिषदेच्या हद्दीबाहेरील काही भागात हे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत.
बँका गृहकर्ज देताना आणि खरेदी विक्रीचे व्यवहार करताना स्टॅम्प ड्युटीसाठी जमिनीचे सरकारी दर हेच आधार मानतात. त्यामुळे रेडिरेकनरच्या दराचा थेट परिणाम बाजारभावावर होतो. राज्याचा नगर रचना विभाग ३१ डिसेंबरला रेडिरेकनरचे नवीन दर जाहीर करतो. त्यानुसार यंदा गोंदिया शहरातील विविध भागातील जमिनीच्या दरात तुलनेने अधिक वाढ झाली आहे. सर्वाधिक दर गोंदिया-आमगाव मार्गावर आहेत.
जिल्ह्यात गोंदिया शहरातील विविध गट क्रमांकांमधील खुल्या जमिनीचे दर वाढले आहेत. गोंदिया शहरात मुख्य बाजार व परिसरातील भूखंडांपेक्षाही रेल्वे उड्डाण पूल ते जयस्तंभ चौक या भागातील भूखंडांचे दर जास्त आहेत. तर नव्याने विकसित होत असलेल्या बालाघाट मार्गावर मात्र सर्वात कमी जमिनीचे दर आहेत.
दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून रेडिरेकनरचे वाढीव दर लागू करण्यात आले आहेत. यामुळे स्टॅप ड्युटी अधिक द्यावी लागते. त्यामुळे पैसे वाचिवण्यासाठी लोकं ३१ डिसेंबरच्या आधीच जमीन खरेदी-विक्र ीचे व्यवहार पूर्ण करतात. यंदाही असेच चित्र कायम होते.
लोकं मोठयÞा संख्येने खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी गर्दी केल्याने संकेतस्थळ जाम झाले होते. (जिल्हा प्रतिनिधी )

Web Title: Land prices increased by 15 percent