शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने लाखोंची हानी

By admin | Updated: May 13, 2016 01:49 IST

जिल्ह्यात २७ एप्रिलपासून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने थैमान घातले. जवळपास प्रत्येक दिवसीच जिल्ह्यात कुठे ना कुठे अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने नुकसान केले.

शेतकरी हवालदिल : उन्हाळी उत्पन्नही घटणारगोंदिया : जिल्ह्यात २७ एप्रिलपासून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने थैमान घातले. जवळपास प्रत्येक दिवसीच जिल्ह्यात कुठे ना कुठे अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने नुकसान केले. त्यामुळे उन्हाळी धानपिकांची मोठ्या प्रमाणात हानी होवून शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत प्रामुख्याने चार तालुक्यांमध्ये शेतपिकांना मोठाच नुकसान पोहोचला आहे. नुकसानीची संख्या कृती विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष नुकसान त्यापेक्षाही अधिक असल्याचे सांगितले जाते. कृषी विभागाने दिलेली संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागातूनच सांगण्यात आले आहे. कृषी विभागाजवळ दरदिवसी अहवाल पाठविणे आवश्यक असते. परंतु जिल्हा कृषी विभागाा तालुका कृषी विभागाने अनेक दिवसांपासून अहवाल पाठविला नाही.जिल्हा कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, ६३३ शेतकऱ्यांची ३६०.४५ हेक्टरमधील पीक बाधित झाले आहे. त्यामुळे एकूण सात लाख १४ हजार ०५६ रूपयांचा नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. गोंदिया तालुक्यात ४० शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागला. त्यांची २५.०२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांना तीन लाख ६८ हजार १९३ रूपयांचे नुकसान झाले आहे. गोरेगाव तालुक्यात ५१५ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यांच्या ३१२.४८ हेक्टरमधील पिकांना क्षती पोहोचली आहे. त्यामुळे ४२ हजार ०१८ रूपयांचे नुकसान झाले. तिरोडा तालुक्यात केवळ ३२ शेतकऱ्यांच्या १२.३५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. त्यांना एक लाख ७३ हजार ४७५ रूपयांचे नुकसान सहन करावे लागले. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४६ शेतकऱ्यांच्या १०.६० हेक्टरमधील पीक क्षतिग्रस्त झाले. त्यांना एक लाख ३० हजार ३७० रूपयांचे नुकसान सहन करावे लागले. याशिवाय हजारो घरेसुद्धा क्षतिग्रस्त झाले आहेत.जिल्ह्यात दरदिवसी अवकाळी पाऊस, वादळ व ओलावृष्टीचे वातावरण निर्माण होत आहे. परंतु अशी परिस्थिती खुप वेळपर्यंत राहत नाही. यानंतरही काही ना काही नुकसान तर होतच आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकसानीची संख्या मिळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु हे काम कासवगतीने सुरू आहे. शेतकरी त्रस्त आहेत. नागरिक चिंताग्रस्त आहेत. परंतु दिलासा मिळण्याची कसलीही संधी दिसून येत नाही. (प्रतिनिधी)