शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईनच्या स्वच्छतेवर लाखो लिटर पाण्याची नासाडी

By admin | Updated: June 6, 2014 00:03 IST

पाणी हेच जीवन व पाण्याचा अपव्यय टाळा हा संदेश देणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला आपल्याच ब्रिदवाक्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या स्वच्छतेवर

गोंदिया : पाणी हेच जीवन व पाण्याचा अपव्यय टाळा हा संदेश देणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला आपल्याच ब्रिदवाक्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या स्वच्छतेवर विभागाने लाखो लीटर पाण्याचा नासाडा सुरू केला. आहे. गुरूवारी (दि.५) शहरातील विवेकानंद कॉलनीत दुपारी हा प्रकार दिसून आला. सर्वत्र पाण्यासाठी धावपळ सुरू असताना येथे मात्र पाण्याचे लोट वाहून जात असल्याने नागरिकांनी या विभागाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली.शहराला २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने वाढीव पाणी पुरवठा योजना दिली. कोट्यवधीच्या या योजनेचे अद्याप पाईपलाईन टाकण्याचे कामच सुरू आहे. एकतर या पाईप लाईनसाठी शहरातील सर्व रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यात लोकप्रतिनिधी व विभाग येत्या दोन महिन्यात योजना सुरू करू असे सांगत वेळ मारून नेत आहेत. त्यांच्या या आश्‍वासनामुळे आता वर्षभरापेक्षा जास्त काळ लोटून गेला व शहरवासीयांना ही योजना फक्त गाजर वाटू लागली आहे. आजही पाईपलाईन टाकण्याचे कामच सुरू असल्याने या योजनेच्या कामास अजून किती दिवस लागणार हे सांगणे कठीण आहे. असे असताना गुरूवारी (दि.५) शहरातील विवेकानंद कॉलनीतील पाईपलाईनमधून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहू लागले. या पाईपमधून लाखो लीटर पाण्याची नासाडी झाल्याचे रस्त्याचे जात असलेल्यांनी बघितले. अगोदरच रखरखता उन्हाळा सुरू असून पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होत असल्याचे चित्र जिल्ह्यातच काय तर शहरातही दिसून येत आहे. अशात याविभागाकडून पाण्याचा असा अपव्यय होत असल्याचे बघून नागरिकांच्या भावना तीव्र झाल्याचे जाणवत होते.या घटनेची माहिती मिळताच मजीप्राचे उपविभागीय अभियंता विवेक बन्नोरे, शाखा अभियंता दांडेकर कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाईपलाईनच्या स्वच्छतेचे काम सुरू असल्याचे सांगत हलक्यावर हा प्रकार घेतला. मात्र या स्वच्छतेवर लाखो लीटर पाणी नालीतून वाहून जात असल्याचे चित्र इतरांना राग अनावर करणारे होते. एकंदर पाईपच्या स्वच्छतेवर लाखो लीटर पाण्याचा अपव्यय विभागाकडून करण्यात येत असल्याने दुसर्‍यांना पाणी वाचविण्याचा संदेश देणार्‍या विभागालाच पाण्याचे काही मोल नसल्याचे दिसून आले. (शहर प्रतिनिधी)