शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

अठरा विश्वे दारिद्र्यातील किसनचे बिऱ्हाड पाठीवर

By admin | Updated: December 23, 2015 02:29 IST

अठराविश्वे दारिद्रयामध्ये जीवन जगणारा किसन राघो कावरे लोणारा येथील रहिवासी आहे.

घराच्या प्रतीक्षेत घर पडले : जागा नसल्यामुळे गाव सोडले, मुलांचा शाळेला रामरामंपालोरा(चौ.): अठराविश्वे दारिद्रयामध्ये जीवन जगणारा किसन राघो कावरे लोणारा येथील रहिवासी आहे. मागील अनेक वर्षापासून म्हातारी आई, पत्नी व दोन मुलासह पडक्या घरात राहत आहे. दारिद्ररेसेखाली नाव असतानी सुद्धा त्याला घरकुल मिळाले नाही. अखेर एकाएकी घर कोसळल्यामुळे त्यांचे कुटूंब रस्त्यावर आले. राहायला ठिकाण नसल्यामुळे किसन आपल्या कुटूंबासह गाव सोडले आहे. मात्र प्रशासनाला आतापर्यंत जाग आली नाही.पवनी पंचायत समिती अंतर्गत लोणारा हे गाव जवळपास २००० हजार लोकवस्तीचे आहे. मागील आठवड्यात किसन कोरे या गरीब मजुराचे घर जमिनदोस्त झाले. या संदर्भात लोकमतने पाठपुरावा केला होता. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाना जाग आली नाही. किसन हा शेतमजूर आहे. दारिद्ररेषेखाली नाव समाविष्ठ असून सुद्धा येथील ग्रामपंचायत प्रशासनाने या लाभार्थ्याला प्रतिक्षा यादीमध्ये नाव समाविष्ठ केले नाही. परिणामता याला अनेक वर्षापासून घरकुल नाही. ज्या लाभार्थ्याला घरकुल योजनेची गरज नाही अशा लाभार्थ्यांला घरकुल दिले जात आहेत. मात्र वरिष्ठ अधिकारी याकडे ढुंकूनही पाहत नाही. किसनच्या घरी वीज नाही. इतके वर्ष तो आपल्या कुटूंबासह अंधारात वास्तव्याला होता. अखेर घर पडल्याने कुठे राहायला जागा मिळेल का म्हणून दारोदारी भटकत आहे. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती पाहुन कुणी राहायला जागा द्यायला तयार नाहीत. अशातच किसनने गाव सोडले. त्याचा मुलगा व मुलगी वर्ग २ मध्ये शिकत आहेत. राहायला जागा मिळत नसल्यामुळे किसने आपल्या पत्नीला मुलासह सासुरवाडीला पाठविले. मात्र दोन्ही मुले शिक्षणापासून दूर झाले आहेत. अधिकारी म्हणतात बीपीएल मध्ये नाव असला तरी प्रतिक्षायादीमध्ये नाव पाहिजे. ग्रामसभेत ठराव घेतला जातो की याला घरकुल देण्यात म्हणून मात्र सभा संपताच गरजूना डावलून र्गीश्रीमंताचे नाव टाकले जाते, असा आरोप किसने केला आहे. हा लाभार्थी दारिद्ररेषेखाली मोडत असतानी सुद्धा त्याल आतापर्यंत शासनाकडून कोणतीही योजना मिळाली नाही. दिवसभर कष्ठ करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करावा कि घर बांधावे, असा प्रश्न या लाभार्थ्याला पडला आहे. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या लाभार्थ्यांनी केली आहे. अगोदर त्यांचे नाव बीपीएल यादीमध्ये समाविष्ठ नव्हते. नंतर तहसील कार्यालयातून जी पुरवनी यादी आली आहे. त्यात त्यांचे नाव समाविष्ठ आहे. नव्याने प्रतिक्षा यादी तयार करीत आहोत. (वार्ताहर)