शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या त्रासाला कंटाळून केले ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 05:00 IST

कोटरा डॅममध्ये मंगळवारी (दि.१३) सकाळी ७ वाजतादरम्यान गावातील लोकांना डॅमच्या पाळीवर रक्त सांडलेले दिसले व बाजूलाच रक्ताने माखलेला दगड दिसून आला होता. याची सालेकसा पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने गळ टाकून शोध घेतला असता तरूणाचा मृतदेह अडकून आला होता.मृताची ओळख न पटल्याने पोलीस पाटील जितेंद्र बडोले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३०२,२०१ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता.

ठळक मुद्देकोटरा डॅममधील मृताची ओळख पटली : पोलिसांनी केली तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत कोटरा डॅममध्ये मिळून आलेल्या तरूणाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व सालेकसा पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून दारूच्या नशेत भांडण करीत असल्याने सततच्या त्रासाला कंटाळून तिघांनी त्याला ठार केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मृताचे नाव रितीक नरेंंद्र चुटे (१८,रा.चावडी चौक, छोटा गोंदिया) असे आहे.कोटरा डॅममध्ये मंगळवारी (दि.१३) सकाळी ७ वाजतादरम्यान गावातील लोकांना डॅमच्या पाळीवर रक्त सांडलेले दिसले व बाजूलाच रक्ताने माखलेला दगड दिसून आला होता. याची सालेकसा पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने गळ टाकून शोध घेतला असता तरूणाचा मृतदेह अडकून आला होता.मृताची ओळख न पटल्याने पोलीस पाटील जितेंद्र बडोले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३०२,२०१ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. तसेच पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या आदेशावरून मृताची ओळख पटविण्यासाठी मृताचे छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅप व सोशल मीडियावर टाकण्यात आले होते. अशात सायंकाळी नरेंद्र चुटे यांनी सालेकसा पोलीस ठाण्यात जाऊन मृत तरूण त्यांचा मुलगा रितीक चुटे असल्याचे सांगीतले. चौकशीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रमेश गर्जे यांचे २ पथक व सालेकसाचे निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी पथक सोधकामासाठी रवाना केले. तपासांतर्गत पोलिसांनी आयुष सुरेंद्र बोरकर (२०), नितेश उर्फ सागर गोविंद तिघारे (२१) व मयुर सुभाष डोंगरगाव (२०,रा.छोटा गोंदिया) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांना खून केल्याचे कबूल केले.असा केला रितीकचा गेमआरोपी आयुष बोरकर हा सोमवारी (दि.१२) रात्री १० वाजतादरम्यान चावडी चौकात मोबाईल बघत बसला असता रितीकने दारूच्या नशेत त्याला शिविगाळ केली व दुचाकी रात्री फोडतो असे बोलून धक्काबुक्की केली. यापूर्वीही रितीकने चाकू दाखवून आयुषला धमकाविले होते. सततच्या या त्रासाला कंटाळून आयुषने आपला मित्र सागर व मयुर यांच्या मदतीने दुचाकीवर बसवून जिल्हा परिषद जवळील शिव मंदिरात नेले व समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र रितीक उलट त्यांना बघून घेण्याची धमकी देऊ लागला. यावर तिघांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली व दुचाकीवर बसवून ठाणामार्गे साखरीटोलाकडे नेत असताना रितीकने दुचाकीवरून पळण्याचा प्रयत्न केला. यावर सागरने त्याचा गळा आवळला मात्र तो मेला नाही. अशात तिघांनी त्याला कोटरा डॅम येथे नेले व दगडाने डोक्यावर मारून ठार केले व डॅमच्या पाण्यात टाकून दिले.

टॅग्स :Murderखून