शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले खैरलांजी गाव

By admin | Updated: March 11, 2016 02:24 IST

तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत खैरलांजी येथे ग्रामपंचायत व महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे ज्यांना जिथे वाटेल तिथे स्वत:च्या मनमर्जीने शासकीय जागेवर ...

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शासकीय जागेवर वाटेल तिथे पक्के घरइंदोरा बु. : तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत खैरलांजी येथे ग्रामपंचायत व महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे ज्यांना जिथे वाटेल तिथे स्वत:च्या मनमर्जीने शासकीय जागेवर अतिक्रमण करून पक्के घरे बांधण्याचा चंग बांधला आहे. यात बुध्दीजीवी नागरिकांनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला असता यावर ग्रामपंचायतचे पदाधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत. या संदर्भात अनेक वर्षांपासून महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी यांना शासकीय आबादी जागेसंबंधी व वनविभागाच्या झुडपी जंगलासंबंधी माहीत असतानासुध्दा या गावाकडे हे अधिकारी दुर्लक्ष का करतात? याचे कारण ग्रामवासीयांना समजेनासे झाले आहे. गावातील काही लोकांनी स्वत:चे गावातील घरे विकून शासकीय मोकळ्या जागेवर वाटेल तेवढी जागा पकडून पक्के घरे बांधली आहेत. आजघडीलासुध्दा घरबांधकाम सुरूच आहे. गावातील काही नागरिकांबरोबर ग्रामपंचायत सदस्यांचासुध्दा समावेश असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. सात ग्रामपंचायत सदस्य असलेल्या ग्रामपंचायतमध्ये विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. गावात नागरिकांनी रस्त्यावरही अतिक्रमण करून जनावरे बांधण्याचासुध्दा विक्रम केला आहे. त्यामुळे गावातील रस्त्यांवरून वाहन चालवताना फार त्रास सहन करावा लागतो. तर जनावरांमुळे वाहन चालकांचे अपघातसुध्दा झाले आहेत. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रस्त्याच्या बाजूला माती भरण्याचे काम सुरू आहे. त्याला लागून शाळेच्या जवळून रस्त्याच्या कडेला काही ग्रामस्थांनी शेणखताचे उरकुडे बनवून ठेवले आहेत. लाखो रुपये खर्च करून शासन रस्ते बनवून गावातील लोकांना रोजगार देते, त्याच ठिकाणी गावातील लोक उरकुडे बनवून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करतात, हे कितपत योग्य आहे. खैरलांजी गाव तिरोडा-अर्जुनी मार्गावर परसवाडा फाट्यापासून चार किमी अंतरावर आहे. या गावावरून चांदोरी खुर्द, सावरा, पिपरीयाकडे जाणारा मार्गही आहे. या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी शासनाने लाखो रुपये मंजूर केले आहे. कामाची सुरूवातही झाली आहे. रस्त्याच्या बाजूला शासकीय जमीन आहे. त्या जमिनीवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. गावात कोणी कोणाला म्हणत नाही म्हणून लोक स्वत:च्या मनमर्जीने वाटेल तेथे अतिक्रमण करीत आहेत. तहसीलदार यांनी गावाला भेट देऊन शासकीय आबादी जमिनीचे निरीक्षण करावे. ज्यांनी शासकीय आबादी जमिनीवर अतिक्रण केले आहे, त्यांच्यावर शासकीय मुंद्राक शुल्क दराने आकारणी करून दंड आकारावे किंवा अतिक्रमण काढावे. ज्या गावातील गरजू व बेघर गरीब लोक आहेत, त्यांना शासकीय दराने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे. या सर्व प्रकाराकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. जेव्हा तहसीलदारांनी गावाचे निरीक्षण करून येथील अतिक्रमण काढावे व नागरिकांच्या समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)