शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

कचारगडला जनसागर उसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

एकीकडे यात्रेच्या ठिकाणी धनेगावला लाखो लोकांची गर्दी जमा होती. तर धनेगावपासून कचारगड गुफेपर्यंत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आजचा दिवस पूर्ण माघ पौर्णिमेचा दिवस असून याच दिवशीच चार ते पाच लाख भाविक कचारगडला येऊन गेले.

ठळक मुद्देप्रशासनाची कसरत : पौर्णिमानिमित्त चार ते पाच लाख भाविकांची हजेरी

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : आदिवासी समाजाचे मक्का मदिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंडी धर्मभूमी कचारगडला रविवारी (दि.९) देश-विदेशातील आदिवासी भाविकांचा जनसागर उसळला होता. एकीकडे यात्रेच्या ठिकाणी धनेगावला लाखो लोकांची गर्दी जमा होती. तर धनेगावपासून कचारगड गुफेपर्यंत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आजचा दिवस पूर्ण माघ पौर्णिमेचा दिवस असून याच दिवशीच चार ते पाच लाख भाविक कचारगडला येऊन गेले.धनेगावकडे जाणारे चारही दिशेचे रस्ते सुद्धा गर्दीने फुलून गेलेले दिसले. यात्रा परिसरात वाहनांना उभे ठेवण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. त्यामुळे चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था हाजराफॉल पहाडाजवळ धनेगावपासून दोन कि. मी. दूर तर कचारगडपासून सहा ते सात कि.मी. अंतरावर वाहने उभी ठेवून पायी प्रवास करीत करावा लागला. गर्दीमुळे पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.७०० जवान तैनातकचारगड यात्रा सुरळीत पार पडावी व भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात सालेकसा पोलीस स्टेशनसह दरेकसा, पिपरीया आणि बिजेपार एओपीचे ७०० जवान येथे तैनात करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी जालंदर नालकूल, पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, प्रशांत पवार व इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस जवान भाविकांना मदत करीत होते.दर तासाला एक एसटीकचारगडला येणारे भाविक रेल्वे मार्गासह स्वत:च्या चारचाकी, दुचाकी वाहनावर येत असले तर दरेकसला गाड्यांचा थांबा कमी असल्याने इतर प्रांतातील भाविक गोंदिया, आमगाव किंवा दुर्ग, डोंगरगड रेल्वेस्टेशनकडे अडकून असल्याने गोंदिया ते धनेगाव, दरेकसा दरम्यान गोंदिया बस आगारातून दर तासााल एस.टी. बस सेवा सुरु करण्यात आली. साकोली, भंडारा आगारातील एसटी बसेस सुद्धा धनेगावपर्यंत चालविण्यात आल्या.आरोग्य विभागाचे कॅम्पप्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गगन गुप्ता यांच्या मार्गदर्शनात यात्रा ठिकाणी एक बेस कॅम्पसह गुप्ता परिसरात आणि जेवन व्यवस्था परिसरात प्राथमिक औषधोपचार कॅम्प लावण्यात आले. यात एक रात्रकालीन कॅप्स सुद्धा असून सहा डॉक्टर आणि ४० आरोग्य कर्मचारी आपली सेवा प्रदान करीत आहेत. या शिवाय ग्रामीण रुग्णालय सालेकसा आणि स्वयंसेवी संस्थेद्वारा व ठिकाणातून औषधोपचार कॅम्प लावण्यात आले. या शिवाय समितीच्या वतीने व स्वयंसेवी लोकांकडून भाविकांना ठिकठिकाणी मोफत भोजन व्यवस्था ठेवण्यात आली. रविवारी अनेक मान्यवरांनी कचारगडला भेट दिली. गोंडी धर्माचार्य यांनी गोंडी धर्म, भाषा, संस्कृती यावर मार्गदर्शन केले. तसेच पौर्णिमेनिमित्त राष्ट्रीय महा गोंगोना कोयापुनेम महासंमेलनचे आयोजन करण्यात आले. यात माघ पौर्णिमा आणि देव पूजनाचे महत्त्व सांगण्यात आले.