शिक्षिकांवर आली लोणचे-पापड विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 05:00 AM2020-08-12T05:00:00+5:302020-08-12T05:00:17+5:30

मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर याचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत गेला. आता दिवसागणिक हजारो रूग्णांची नोंद होत आहे. शासनाने मार्च ते मे महिन्यापर्यंत कडक लॉकडाऊन केले. मात्र त्यानंतर विस्कटलेली अर्थव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी हळूहळू उद्योगधंद्यांना परवानगी दिली. पण अडीच तीन महिने बंद पडून असलेल्या उद्योगांवर अवकळा आल्याने त्यांना कर्मचारी कपात करावी लागली.

It was time for the teachers to sell pickles | शिक्षिकांवर आली लोणचे-पापड विकण्याची वेळ

शिक्षिकांवर आली लोणचे-पापड विकण्याची वेळ

Next
ठळक मुद्देपेन-पुस्तक हिरावले : शिक्षकांना शोधावा लागतोय अन्य रोजगार, लॉकडाऊनमुळे हिरावला रोजगार

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनामुळे अवघ्या जगाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. परिणामी उद्योगधंदे व व्यवसाय बंद पडले आहे. तेथे कामावर असलेल्यांवर बेरोजगारीची पाळी आली आहे. यातच शाळा बंद असल्याने शिक्षकांच्या हातचे कामही गेले असून आता त्यांना अन्य रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. अशात येथील काही शिक्षिकांच्या हाती आता पेन-पुस्तक सोडून लोणचे-पापड विकण्याची वेळ आल्याचे बिकट चित्र पाहयला मिळत आहे. एवढेच नव्हे तर अन्य काही व्यवसायात असलेल्यांनाही आपले क्षेत्र बदलावे लागत आहे.
मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर याचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत गेला. आता दिवसागणिक हजारो रूग्णांची नोंद होत आहे. शासनाने मार्च ते मे महिन्यापर्यंत कडक लॉकडाऊन केले. मात्र त्यानंतर विस्कटलेली अर्थव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी हळूहळू उद्योगधंद्यांना परवानगी दिली. पण अडीच तीन महिने बंद पडून असलेल्या उद्योगांवर अवकळा आल्याने त्यांना कर्मचारी कपात करावी लागली.
विशेष म्हणजे, कोरोनामुळे अद्याप शाळांचा ठोका वाजलेला नसल्याने शिक्षकांना घरीच बसून रहावे लागत आहे.शाळा नाही पगार कोठून अशी स्थिती खासगी शाळेत कार्यरत शिक्षकांची झाली आहे. एकंदर कोरोनामुळे कित्येक चाकरमानी तसेच व्यवसायिकांवर बरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. असे असले तरिही पोटाची खळगी भरण्यासाठी काम तर करावे लागणार असल्याने आता अशा कित्येकांना आपले मूळ काम सोडून अन्य काम करावे लागत आहे. यात शिक्षकांचा भरणा जास्त असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
आजची स्थिती बघता कित्येक शिक्षिकांनी रिकामे बसून होणार नसल्याने घरातच राहून लोणचे, पापड अन्य खाद्यपदार्थांचा व्यवसाय थाटल्याचे बघावयास मिळत आहे. शाळा सुरू नसल्याने संस्था चालकांना पगारासाठी हात वर केले आहे.
अशात अन्य कामे करून आपला उदरनिर्वाह करण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. तर शिक्षकही अन्यत्र कामावर जात असून काहींनी आपला छोटामोठा व्यवसाय थाटल्याचे दिसत आहे.
कोरोनाच्या या ग्रहणाने भल्याभल्यांची अडचण केली असून कधी पेन व पुस्तक असणारे हात मात्र आज लोणचे, पापड विकण्याच्या किंवा अन्य काही कामांमध्ये गुंतल्याचे दिसत आहे.

बिछायत व्यावसायिकांची फसगत
कोरोनामुळे कार्यक्रमच काय आता सणासुदींवरही निर्बंध आले आहे.परिणामी बिछायत व्यवसायीकांच्या हाती कामे नाहीत. परिणामी तेही रिकामे बसले असून अडचणीत आले आहेत. हाती पैसा येत नसल्याने कित्येकांनी त्यांच्याकडील कामगारांना सोडले आहे. एवढेच नव्हे तर कित्येक बिछायत व्यवसायीक आता खुद्द आपली ही लाईन सोडून अन्य कामांत उतरल्याचे दिसत आहे. लहान-सहान काही तरी व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करीत असल्याचे चित्र आहे.

पानठेल्यांमधून भाज्यांची विक्री
राज्यात तंबाखू बंदी असून तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध आहेत. त्यात थूंकीतूनही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शासनाने पानठेल्यांवर बंदी लावली होती. आता परवानगी दिली असतानाही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करता येणार नाही. विशेष म्हणजे, आज गुटखा शौकीनांची संख्या जास्त असून पानठेलेवाल्यांनाही त्यातच जास्त फायदा आहे. मात्र त्यावरच बंदी असल्याने पानठेलेवाल्यांची अडचण झाली आहे. परिणामी शहरातील कित्येक पानठेलेवाले आता पानठेल्यांतून भाज्यांची विक्री करताना दिसत आहे.

Web Title: It was time for the teachers to sell pickles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक