बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 19:05 IST2025-11-22T19:02:40+5:302025-11-22T19:05:07+5:30
Gondia : वडिलांच्या नावाला काळिमा फासणारी घटना डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात घडली असून, वडिलांनीच आपल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Is the father a monster? The father tortured the 14-year-old girl who was sleeping with him; The girl gave birth to a baby
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वडिलांच्या नावाला काळिमा फासणारी घटना डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात घडली असून, वडिलांनीच आपल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात पीडित मुलीने येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. आरोपीची (४०) पत्नी मागील दहा वर्षांपासून माहेरी राहत असून, आरोपीसोबत घरात मुलगी, मुलगा आणि आरोपीची आई राहत होते.
मुलगी लहान असल्याने बापासोबतच झोपत होती आणि याचाच फायदा घेत आरोपी बापाने विकृतपणे तिच्यावर अत्याचार केला. काही महिन्यांपासून पोटात अस्वस्थता जाणवल्यानंतर मुलीला येथील महिला रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीदरम्यान मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. डुग्गीपार पोलिस ठाण्यात आरोपी बापावर लैंगिक बाल शोषण प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला बुधवारी (दि.१९) अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (दि.२१) पोलिस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यावर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.