शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारातून वाढणार सिंचन

By admin | Updated: December 20, 2015 01:55 IST

शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात भरघोस कामे झाली आहेत.

गोंदिया : शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात भरघोस कामे झाली आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यात १ हजार ५८ कामे करण्याची मंजुरी मिळाली होती. त्यापैकी ८३० कामे पूर्ण झाली असून त्यावर २६ कोटी ९८ लाख ५५ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. अजून ३१ कामे प्रगतिपथावर आहेत.जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून माती नालाबांधची १८ कामे करायची होती ती करण्यात आली आहे. त्या कामावर ९६ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. गॅबियन स्ट्रक्चरची ३४ कामे करायची होती ती कामे पुर्ण करण्यात आली. त्या कामावर १८ लाख ९५ हजार रूपये खर्च करण्यात आले. ६२ शेततळींची कामे करायची होती. त्यातील ६० कामे झाली असून दोन कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांवर ६२ लाख २० हजार रूपये मंजूर करण्यात आले आहे. साखळी सिमेंट बंधाऱ्यांची ११४ कामे करायची होती. यातील ५२ कामे पुर्ण झाली आहेत. १४ कामे प्रगतिपथावर आहेत. या कामावर आतापर्यत ४ कोटी ६९ लाख ८४ हजार रूपये खर्च करण्यात आले आहे. सिमेंट बंधारा दुरूस्तीची आठ कामे मंजूर करण्यात आली, त्यातील एक काम पूर्ण झाले तर चार प्रगतिपथावर आहेत. तीन कामे नंतर सुरू करण्यात येणार आहेत. या कामांवर २४ लाख ९० हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. नाला खोलीकरण व सरळीकरणाची २४ कामे मंजूर होऊन १५ कामे पूर्ण झाली आहेत. आठ कामे नंतर सुरू होणार आहेत. या कामांवर एक कोटी ८५ लाख ७८ हजार रूपये खर्च करण्यात आले आहे. ठिकठिकाणी असलेल्या गावतलावांमधून गाळ काढण्याची शासकीय १११ कामे मंजूर झाली असून ९९ कामे पूर्ण झाली आहेत. चार कामे प्रगतिपथावर आहेत तर आठ कामे बंद आहेत. या कामावर ३ कोटी ३१ लाख २४ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. सलग समतल चराची चार कामे करायची होती. ती पूर्ण झाली आहेत. त्या कामावर १५ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या मामा तलावांमधील पाण्याचा वापर करण्यासाठी त्यातील गाळ काढण्याची ६२ कामे सीएसआरअंतर्गत मंजूर झाली होती. त्यातील ४६ कामे पूर्ण झाली असून १६ कामे बंद आहेत. या कामावर २ कोटी ६४ लाख ४५ हजार रूपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ठिंबक सिंचनाची २३९ कामे मंजूर असून ती पुर्ण करण्यात आली. त्यावर ८३ लाख ७४ हजार रूपये खर्च करण्यात आले. तुषार सिंचनाची आठ कामे मंजूर झाली होती ती कामे १ लाख ८६ हजारातून पुर्ण करण्यात आली आहेत. दोन वनतलाव मंजूर झाले. त्यातील एक काम पूर्ण झाले असून दुसरे प्रगतिपथावर आहे. यासाठी ३६ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवाराच्या विविध कामांमुळे पाण्याची पातळी निश्चितपणे वाढेल, असा विश्वास अधिकारी व्यक्त करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)