संसर्ग आटोक्यात येत असल्याने ५२ टक्के बेड रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:30 IST2021-05-18T04:30:12+5:302021-05-18T04:30:12+5:30

गोंदिया : एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांचा आलेख प्रचंड वाढल्याने शासकीय आणि खासगी रुग्णालयातील बेड हाऊस फुल्ल झाल्याचे चित्र होते. मात्र ...

As the infection is under control, 52% of the beds are empty | संसर्ग आटोक्यात येत असल्याने ५२ टक्के बेड रिकामे

संसर्ग आटोक्यात येत असल्याने ५२ टक्के बेड रिकामे

गोंदिया : एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांचा आलेख प्रचंड वाढल्याने शासकीय आणि खासगी रुग्णालयातील बेड हाऊस फुल्ल झाल्याचे चित्र होते. मात्र आता काेरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आल्याने रुग्णालयात सहज बेड उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. यामुळे काही खासगी रुग्णालयाकडून बेड नसल्याचे सांगून केली जाणारी लूटदेखील आता बंद झाली आहे.

एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच उद्रेक पहावयास मिळाला. दिवसाकाठी जवळपास ५०० ते ७०० रुग्णांची भर पडत होती. यामुळे एकाकी वाढलेल्या रुग्णसंख्येचा लाभ घेत काही खासगी डॉक्टरांनी उपचाराच्या नावाखाली लूटदेखील केल्याचे प्रकार उघडकीस आला होता. जिल्हा प्रशासनाच्या फलकावर सर्व रुग्णालय हाऊसफुल दाखवायचे. मात्र प्रत्यक्षात ज्यांच्याकडे पैसा त्यानाच रुग्णालयात दाखल करून उपचार द्यायचे. जवळपास एक रुग्णाकडून ३ ते ४ लाख रुपयाहून अधिकचे बिलही घेण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. मात्र गोंदिया जिल्ह्यात मे महिन्यापासून संसर्गाचा वेग मंदावल्याने खासगी डॉक्टरांच्या गोरखधंदावरच ब्रेक लागल्याचे समोर आले आहे. जे रुग्णालय हाऊसफुल असायचे त्या रुग्णालयात आता ५० टक्क्यांहून अधिक बेड उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करू लागले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातही ५० ते ६० टक्के बेड रिकामे झाले आहेत.

........

शासकीय रुग्णालयात २५८ बेड उपलब्ध

कोरोनाच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा धसका घेत जिल्हा प्रशासनाकडून शासकीय रुग्णालयांतील भौतिक व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली. यामध्ये शासकीय रुग्णालयात पर्याप्त प्रमाणात बेड उपलब्ध होऊ लागले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा क्रीडा संकुल येथील डीसीएचसी, आयुर्वेदिक महाविद्यालय व तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात एकूण ४३५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यातील आजघडीला २५८ बेड उपलब्ध आहेत.

....

१७ सीसीसीमध्ये १०९ रुग्ण

शहरासह ग्रामीण भागात बाधित रुग्णांवर उपचार करता यावे, यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. आजघडीला गोंदिया जिल्ह्यात ९६७ बेडक्षमतेचे १७ कोविड केयर सेंटर कार्यरत आहेत. यामध्ये फक्त १०९ रुग्ण दाखल असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून प्राप्त आहे. परिणामी अनेक सीसीसी रुग्णविनाच कार्यरत आहेत.

Web Title: As the infection is under control, 52% of the beds are empty