शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा कौशल्यासाठी स्वतंत्र प्रबोधिनी

By admin | Updated: December 20, 2015 01:49 IST

आदिवासी समाजातील विद्यार्थी व तरुण-तरुणीच्या क्रीडा कौशल्य विकासासाठी क्रीडा प्रबोधिनी स्थापन्याचा शासनाचा मानस असल्याचे राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी सांगितले.

आदिवासी विकासमंत्र्यांचे सूतोवाच : बोरगाव येथे एकलव्य निवासी शाळेचे भूमिपूजनगोंदिया : आदिवासी समाजातील विद्यार्थी व तरुण-तरुणीच्या क्रीडा कौशल्य विकासासाठी क्रीडा प्रबोधिनी स्थापन्याचा शासनाचा मानस असल्याचे राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी सांगितले. देवरी तालुक्यातील बोरगाव येथील एकलव्य निवासी शाळेच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार संजय पुराम, आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ.माधवी खोडे, उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार संजय नागटिळक, पंचायत समिती सभापती देवकीबाई मरई, आदिवासी विकास मंडळाचे संचालक भरत दुधनाग व प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे प्रामुख्याने उपस्थित होते.महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिकद्वारा संचालित देवरी तालुक्यातील बोरगाव येथील एकलव्य निवासी पब्लिक स्कूलच्या इमारतीच्या जागेचे भूमिपूजन शनिवारी (ता.१९) ना.सावरा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना सावरा म्हणाले, आदिवासी विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या अनेक योजना हाती घेतल्या आहेत. नामांकित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची योजना शासनाने अतिशय प्रभावीपणे राबविली असून यावर्षी नामांकित शाळा प्रवेशासाठी २५ हजार अर्ज प्राप्त झाले आहे. त्यापैकी २२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्याचे हित लक्षात घेता तसेच त्यांच्यामधील सुप्त क्रीडा कौशल्य गुणांना विकसीत करण्यासाठी प्रबोधिनी स्थापन्याचा शासनाचा विचार आहे. या प्रबोधनीच्या माध्यमातून आदिवासी समाजातील गुणवान तरुण-तरुणी राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावण्यासाठी तयार होतील असा विश्वास यावेळी ना.सावरा यांनी व्यक्त केला.यावेळी शाळेच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच हजार रुपयांचा धनादेश सावरा यांना सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी आदिवासी विभागातर्फे चालणाऱ्या योजनांची माहितीही प्रकल्प अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. आभार प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)विविध सोयीसुविधा मिळणारआदिवासी समाजातील विद्यार्थी भारतीय प्रशासकीय सेवा, इंजिनियर व डॉक्टर व्हावेत यासाठी आदिवासी विकास विभाग मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी सुद्धा विभागाने योजना सुरु केली आहे. सध्या असलेल्या विभागाच्या २०६ आश्रमशाळा व वसतिगृहाच्या इमारत बांधकामाला मंजुरी मिळाली असून ८० शाळा वसतिगृहाचे बांधकाम मार्च २०१६ अखेर पूर्ण होणार आहे. विद्यार्थ्याना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध असून अडचणीवर मात करुन विद्यार्थ्यांनी शिक्षणात नावलौकिक मिळावावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.