शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढवा

By admin | Updated: March 13, 2016 02:09 IST

पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात लाखो लिटर दूधाचे उत्पादन होत असतानाच गोंदिया जिल्ह्यात फक्त १०-२० हजार लीटर दुधाचे उत्पादनही होत नाही.

पालकमंत्री बडोले : दासगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण गोंदिया : पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात लाखो लिटर दूधाचे उत्पादन होत असतानाच गोंदिया जिल्ह्यात फक्त १०-२० हजार लीटर दुधाचे उत्पादनही होत नाही. ही स्थिती बदलायची असून शेतकऱ्यांनी शेतीला जोड म्हणून पशुपालन व दुग्ध व्यवसाय सुरू केला पाहिजे. शासनाच्या व्यवस्थांचा फायदा घेत नागरिकांनी पशुधन विकासावर जोर देऊन जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढवावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. गुरूवारी (दि.१०) तालुक्यातील ग्राम दासगाव येथे नवनिर्मित पशु वैद्यकरीय दवाखानाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, पशुसंवर्धनावर विशेष लक्ष दिल्यामुळे मागील ५ वर्षात गोंदिया विधानसभेत क्षेत्रातील सर्व श्रेणी २ च्या पशुवैद्यकीय दवाखान्यांचा दर्जा वाढवून श्रेणी १ करण्यात आली आहे. सोबतच कुडवा येथे आधुनिक पॉलिक्लिनीकची स्थापना करण्यात आल्याचे सांगीतले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, उपाध्यक्ष रचना गहाणे, पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, आरोग्य सभापती पी.जी.कटरे, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपुरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी.गावडे, पंचायत समिती सभापती स्नेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पडवी, जिल पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस.एम.चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य रजनी गौतम, पंचायत समिती सदस्य रामराज खरे, सरपंच कविता मेश्राम, उपसरपंच दिलीप मिश्रा व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)