शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

परिसरात रेतीचा अवैध उपसा सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 05:00 IST

पोलीस व आरटीओ विभागातील अधिकारी-कर्मचारी नियम सांगून एक लाख १५ हजार रूपये बळजबरीने वसूल करतात. तर दुसरीकडे रेती तस्करांना सर्वप्रकारची मुभा देतात. महसुल, खनन व पोलीस अधिकाऱ्यांंची चिरीमीरी असल्याने रेती तस्कर चांगलेच फुगून गेल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देमहसुली विभागाची साठगाठ : मध्यप्रदेशातून रेतीची तस्करी

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : तिरोडा तालुक्यातील सावरा, पिपरिया, अर्जुनी, कवलेवाडा, करटी खु., घाटकुरोडा, चांदोरी बु. व गोंदिया तालुक्यातील सालइटोला, मुरदाडा, महालगाव, देवरी, किन्ही, डांगोरली व मध्यप्रदेशातून खैरी घाटा येथून रेतीची अवैध वाहतूक मोठया प्रमाणात सुरुच आहे. एकीकडे ट्रॅक्टर पकडून महसूल, पोलीस व आरटीओ विभागातील अधिकारी-कर्मचारी नियम सांगून एक लाख १५ हजार रूपये बळजबरीने वसूल करतात. तर दुसरीकडे रेती तस्करांना सर्वप्रकारची मुभा देतात. महसुल, खनन व पोलीस अधिकाऱ्यांंची चिरीमीरी असल्याने रेती तस्कर चांगलेच फुगून गेल्याचे बोलले जात आहे.रेतीचा व्यवसाय करणाऱ्यांत लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, आजी-माजी आमदार, व अधिकारी व त्यांच्या नातेवाईकांची मुले सर्वाधिक असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे रेती तस्करीचा कारभार मोठया जोमात सुरु आहे. प्रशासनाला सर्व माहिती आहे मात्र ‘मिळून वाटून खाऊ’ या धर्माचे पालन होत असल्याने महसूल प्रशासन गप्प असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अनेक घाटांचे लिलाव झाले नाही. अशात रेतीची रॉयल्टी नसताना अवैध वाहतूक सुरु आहे. सर्वच रेती घाटांचा लिलाव करणे गरजेचे आहे. मात्र लिलाव न झाल्याने गरीब, घरकुल लाभार्थी व नागरीकांना अवैध धंदेवाल्यांकडून जादा दरात रेती विकत घ्यावी लागत आहे. यामुळे नागरिकांना ही याचा आर्थिक फटका बसत आहे.नदीपात्रातून अवैध रेती टिप्पर व ट्रॅक्टरमध्ये भरुन तिरोडा, गोंदिया, गोरेगाव व अन्य तालुक्यांत तसेच नागपूरला जात आहे. याकडे तत्कालीन जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांच दुर्लक्ष होते. आता जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नवीन आल्याने कोणती भूमिका घेतात याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.रेती घाटांचा लिलाव करणे गरजेचेरेती घाटांचा लिलाव झाला नसताना मोठया प्रमाणात रेती तस्करी सुरु आहे. प्रशासनाने रेती घाटांचे लिलाव करणे गरजेचे झाले आहे. लिलाव न झाल्यामुळे अवैध रेती तस्कर चढया भावात रेती विक्री करीत आहेत. याचा फटका गरीब नागरिकांना बसत आहे. रेती तस्करीमुळे परिसरातील रस्त्याची वाट लागली आहे. अपघातात वाढ होण्याची शक्यता आहे. अवैध रेती टिप्परमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे.

लोकप्रतिनिधी गप्प का नागरिकांचा प्रश्नरेती घाटांचा लिलाव झाला नसतानाही मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू आहे. याबाबत अधिकारी व लोकप्रतिनिधी सर्वच जाणून आहेत. तरिही काहीच होत नसल्याने रेती तस्कर गब्बर झाले आहेत. विशेष म्हणजे, रेती तस्करांकडून कारवाईसाठी गेलेल्या इमानदार अधिकाºयांवर हल्ले झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. जिल्ह्यातही अधिकाºयांना रेती तस्करांकडून मारहाण झाल्याचे प्रकार घडल आहेत. मात्र एवढे सर्व होत असूनही लोकप्रतनिधी गप्प का असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी