परिसरात रेतीचा अवैध उपसा सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 05:00 AM2020-09-25T05:00:00+5:302020-09-25T05:00:31+5:30

पोलीस व आरटीओ विभागातील अधिकारी-कर्मचारी नियम सांगून एक लाख १५ हजार रूपये बळजबरीने वसूल करतात. तर दुसरीकडे रेती तस्करांना सर्वप्रकारची मुभा देतात. महसुल, खनन व पोलीस अधिकाऱ्यांंची चिरीमीरी असल्याने रेती तस्कर चांगलेच फुगून गेल्याचे बोलले जात आहे.

Illegal extraction of sand in the area continues | परिसरात रेतीचा अवैध उपसा सुरुच

परिसरात रेतीचा अवैध उपसा सुरुच

Next
ठळक मुद्देमहसुली विभागाची साठगाठ : मध्यप्रदेशातून रेतीची तस्करी

लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील सावरा, पिपरिया, अर्जुनी, कवलेवाडा, करटी खु., घाटकुरोडा, चांदोरी बु. व गोंदिया तालुक्यातील सालइटोला, मुरदाडा, महालगाव, देवरी, किन्ही, डांगोरली व मध्यप्रदेशातून खैरी घाटा येथून रेतीची अवैध वाहतूक मोठया प्रमाणात सुरुच आहे. एकीकडे ट्रॅक्टर पकडून महसूल, पोलीस व आरटीओ विभागातील अधिकारी-कर्मचारी नियम सांगून एक लाख १५ हजार रूपये बळजबरीने वसूल करतात. तर दुसरीकडे रेती तस्करांना सर्वप्रकारची मुभा देतात. महसुल, खनन व पोलीस अधिकाऱ्यांंची चिरीमीरी असल्याने रेती तस्कर चांगलेच फुगून गेल्याचे बोलले जात आहे.
रेतीचा व्यवसाय करणाऱ्यांत लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, आजी-माजी आमदार, व अधिकारी व त्यांच्या नातेवाईकांची मुले सर्वाधिक असल्याचे वृत्त आहे.
त्यामुळे रेती तस्करीचा कारभार मोठया जोमात सुरु आहे. प्रशासनाला सर्व माहिती आहे मात्र ‘मिळून वाटून खाऊ’ या धर्माचे पालन होत असल्याने महसूल प्रशासन गप्प असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अनेक घाटांचे लिलाव झाले नाही. अशात रेतीची रॉयल्टी नसताना अवैध वाहतूक सुरु आहे. सर्वच रेती घाटांचा लिलाव करणे गरजेचे आहे. मात्र लिलाव न झाल्याने गरीब, घरकुल लाभार्थी व नागरीकांना अवैध धंदेवाल्यांकडून जादा दरात रेती विकत घ्यावी लागत आहे. यामुळे नागरिकांना ही याचा आर्थिक फटका बसत आहे.
नदीपात्रातून अवैध रेती टिप्पर व ट्रॅक्टरमध्ये भरुन तिरोडा, गोंदिया, गोरेगाव व अन्य तालुक्यांत तसेच नागपूरला जात आहे. याकडे तत्कालीन जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांच दुर्लक्ष होते. आता जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नवीन आल्याने कोणती भूमिका घेतात याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

रेती घाटांचा लिलाव करणे गरजेचे
रेती घाटांचा लिलाव झाला नसताना मोठया प्रमाणात रेती तस्करी सुरु आहे. प्रशासनाने रेती घाटांचे लिलाव करणे गरजेचे झाले आहे. लिलाव न झाल्यामुळे अवैध रेती तस्कर चढया भावात रेती विक्री करीत आहेत. याचा फटका गरीब नागरिकांना बसत आहे. रेती तस्करीमुळे परिसरातील रस्त्याची वाट लागली आहे. अपघातात वाढ होण्याची शक्यता आहे. अवैध रेती टिप्परमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे.


लोकप्रतिनिधी गप्प का नागरिकांचा प्रश्न
रेती घाटांचा लिलाव झाला नसतानाही मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू आहे. याबाबत अधिकारी व लोकप्रतिनिधी सर्वच जाणून आहेत. तरिही काहीच होत नसल्याने रेती तस्कर गब्बर झाले आहेत. विशेष म्हणजे, रेती तस्करांकडून कारवाईसाठी गेलेल्या इमानदार अधिकाºयांवर हल्ले झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. जिल्ह्यातही अधिकाºयांना रेती तस्करांकडून मारहाण झाल्याचे प्रकार घडल आहेत. मात्र एवढे सर्व होत असूनही लोकप्रतनिधी गप्प का असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

Web Title: Illegal extraction of sand in the area continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.