शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळ गारपिटीचा चिचगड परिसराला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पाऊस गारपिटीसह चक्रीवादळाला सुरूवात झाली. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा येथील वनविभागाच्या वसाहतीला बसला झाली.वनक्षेत्राधिकारी निवासस्थान आणि वनरक्षकाचे निवासस्थानाचे संपूर्ण छत उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण : घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड

लोकमत न्यूज नेटवर्कचिचगड : देवरी तालुक्यातील चिचगड परिसरात मंगळवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास आलेल्या चक्रीवादळ आणि गारपिटीचा फटका या परिसरातील रब्बी पिके आणि घरांना मोठ्या प्रमाणात बसला. चक्रीवादळामुळे अनेक घरांचे छत उडाले तर काही प्रमाणात घरांची पडझड सुध्दा झाली आहे. यामुळे गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पाऊस गारपिटीसह चक्रीवादळाला सुरूवात झाली. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा येथील वनविभागाच्या वसाहतीला बसला झाली.वनक्षेत्राधिकारी निवासस्थान आणि वनरक्षकाचे निवासस्थानाचे संपूर्ण छत उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. चक्रीवादळामुळे वनपरिक्षेत्राधिकारी शासकीय निवासस्थानचे छत पूर्ण उडाले व त्यावर निंबाचे झाड कोसळल्याने अधिक नुकसान झाले. वायरलेस टॉवर पडून कार्यालयाचे नुकसान झाले. चक्रीवादामुळे चिचगड येथील अनेक घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे गावकऱ्यांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दिवस उजाडताच अनेक शेतकºयांनी आपल्या शेताकडे धाव नुकसानीची पाहणी केली. हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस गारपीट आणि पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.अर्जुनी मोर. तालुक्यातील तीन गावांचे नुकसानमंगळवारी आलेल्या चक्रीवादळ आणि गारपिटीचा फटका अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रामपुरी, एलोडी, जांभळी या गावांना बसला. या तिन्ही गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. तलाठी आणि कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे.जिल्हाधिकाºयांनी दिले सर्वेक्षणाचे नुकसानदेवरी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील काही गावांना मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला. यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली असून रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाºयांना दिले आहे.

टॅग्स :Rainपाऊस