शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

माकडांच्या हैदोसाने गावकऱ्यांच्या नाकी नऊ

By admin | Updated: December 19, 2015 01:48 IST

परिसरातील शेतकरी दिवसभर कबाडकष्ट करून पिकांची लागवड करतात. परंतु माकडांच्या अतिउपद्रवामुळे पिकांची नासाडी तर होतच आहे.

रावणवाडी : परिसरातील शेतकरी दिवसभर कबाडकष्ट करून पिकांची लागवड करतात. परंतु माकडांच्या अतिउपद्रवामुळे पिकांची नासाडी तर होतच आहे. शिवाय घरावरील कवेलूंचीही मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. यामुळे ग्रामीण जनतेला त्रास सहन करावा लागत असतानाच आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील गावांमध्ये बऱ्याच काळापासून माकडांचा वावर आहे. माकडांचे कळपच गावात शिरून उच्छाद घालतात. आजही ग्रामीण भागात कौलारू घरांची संख्या अधिक आहे. अशात माकडांचे कळप घरांच्या छतावर धिंगाणा घालतात व त्यामुळे कवेलूंची तोडमोड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परिणामी गावकऱ्यांना अतिरीक्त आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत आहे. सध्याचा आधुनिक काळात देशी कवेलू बनविण्याचा व्यवसाय आधीच बंद पडल्यामुळे जनतेला आता त्या रिकाम्या जागी टीनपत्रे किंवा सिमेंट सीट घालणे भाग पडत आहे. आजही ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूरांकडे एवढा पैसा नसल्याने त्यांना घरावर एवढा खर्च करणे न परवडणारे होत आहे. हा प्रकार फक्त एवढ्यावरच थांबत नसून खाद्याच्या शोधात माकडांकडून शेतातील पिकांचीही मोठ्या प्रमाणात नुकसानी केली जाते. ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान वन्यप्राणी करीत असतात. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जेवढे नुकसान झाले तेवढीच आर्थिक मदत वनविभागातर्फे देणे आवश्यक आहे. मात्र माकडांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वनविभागाकडून कधीच शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. (वार्ताहर)म्हणून शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली राहणारा शेतकरी वन्यप्राण्यांच्याकडून होणाऱ्या नुकसानीने पूरता खचून गेला आहे. एखाद्या शेतकऱ्याने शेतीच्या भोवताल विद्युत प्रवाहाचे कुंपन घातले. तर काही शेतकरी पिकांवर विष प्रयोग करतात. त्यामुळे एखाद्या वन्यप्राण्याचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीला वनविभागाकडून वन्यप्राणी सरंक्षण कायद्याचा धाक दाखवून कोर्टाच्या पायऱ्या चढायला भाग पाडतात. तर काही ठिकाणी वन्यप्राणी कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या मृत्युबाबद तुरूगांत डांबतात. अशावेळी शेतकऱ्यांनी करावे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येऊन माकडांचा कायमचा बंदोबस्त करून संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येबाबद उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)