शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मानव विकासच्या बसेस फक्त मुलींसाठी चालवाव्या

By admin | Updated: March 10, 2016 02:36 IST

प्रादेशिक व्यवस्थापक नागपूर अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर तसेच भंडारा विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या आगारांमध्ये मानव विकास कार्यक्रमाच्या ...

देवरी : प्रादेशिक व्यवस्थापक नागपूर अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर तसेच भंडारा विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या आगारांमध्ये मानव विकास कार्यक्रमाच्या निळ्या स्कूल बसेसमध्ये शालेय फेरीत मार्गफलक लावून मानव संसाधन विकास बस ‘फक्त मुलींकरिता’ अशा प्रकारचे फलक निळ्या बसेसमध्ये लावण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी मानव विकास समितीचे सदस्य नरेश जैन यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र देऊन केली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण क्षेत्रातील मुलींना गावापासून शाळेपर्यंत ने-आण करण्याकरिता शासनाने प्रत्येक तालुक्यासाठी सात बसेस दिल्या आहेत. शासनाने एसटी महामंडळाला बसेस विकत घेऊन दिल्या असून प्रती बसमागे वर्षाला सात लाख चार हजार रूपये देखभाल खर्च म्हणून शासन देते. या निळ्या बसेस फक्त मुलींकरिता चालविण्यात यावे, असे स्पष्ट आदेश असतानासुध्दा नियमांना धाब्यावर ठेवून एसटी महामंडळचे अधिकारी शालेय फेरीत मुली व्यतिरिक्त मुलांना व इतर व्यक्तींनासुध्दा बसवितात. त्यामुळे या निळ्या बसेसच्या उद्देशाला एसटी महामंडळ काळीमा फासत असल्याचे दिसून येते.वारंवार या बसेस फक्त मुलींकरिता चालविण्यात यावे, अशी मागणी जैन यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना करूनसुध्दा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आता नरेश जैन यांनी थेट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र देऊन ‘मानव विकास बस फक्त मुलींसाठी’ असा फलक प्रत्येक स्कूल बसमध्ये लावण्यात यावे व मार्गफलक लावण्यात यावे. जेणेकरून शासनाच्या योजनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होईल. त्यामुळे शालेय फेरीत कोणतेही वाहक व चालक विद्यार्थिनींसोबत इतर प्रवाशांची वाहतूक करणार नाही, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)