शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी न राहता कर्मचारी घेतात घरभाडे

By admin | Updated: June 4, 2014 23:52 IST

तालुक्याच्या ग्रामीण परिसरात अनेक शासकीय निम्मशासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून ग्रामीण भागात नोकरी करतात. खोटे दस्ताऐवज सादर करून घरभाडे उचलतात.

रावणवाडी : तालुक्याच्या ग्रामीण परिसरात अनेक शासकीय निम्मशासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून ग्रामीण भागात नोकरी करतात. खोटे दस्ताऐवज सादर करून घरभाडे  उचलतात. ग्रामीण भागातील कर्मचारी घरभाडे खिशात घालून शासन व जनतेची फसवणूक करतात. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा अनुशासन नियम १९६७ च्या नियम ३ नुसार कर्मचार्‍यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असले तरी शासकीय निमशासकीय कार्यालयात या नियमाचे पालन होताना दिसत नाही. परंतु अधिकारी कर्मचारी शासनाची दिशाभूल करून घर भाड्याची उचल मात्र प्रत्येक महिन्याला होत आहे. शासनाकडून असे नियम का म्हणून ठरविण्यात आले. असा प्रश्न जनसामान्य नागरिकाकडून होत आहे. कर्मचारी अधिकारी स्वयंमर्जीने आपल्या सुख सुविधेसाठी अपडाऊन करीत आहेत. तर त्या कर्मचार्‍यांना घरभाडे कशासाठी देण्यात येत आहे. हे जानून घेण्याची तीव्र इच्छा ग्रामीण नागरिक प्रकट करीत आहेत. ग्रामीण भागात नियुक्त कर्मचार्‍यांना मुख्यालयी राहून जनतेची सेवा बंधनकारक असताना असंख्य कर्मचारी या नियमाना हरताळ फासतात. ग्रामीण जनतेला यामुळे शासनाच्या विविध सेवा योजनापासून वंचीत राहावे लागते. अपडाऊनमुळे शाळेत विद्यार्थ्यांंना योग्य शिक्षण मिळत नाही म्हणून विद्यार्थी खासगी शाळेची रस्ता धरीत आहेत. वृक्षाची अवैध कत्तल होत आहे. मात्र त्यावर अंकुश लावणारा कुणीच समोर घेत नाही. सर्व सामान्य नागरिकासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून आरोग्य केंद्रे उभारली आहेत. त्यात कर्मचार्‍यासाठी निवासस्थानाची सुविधा केली.  मात्र नागरिकाना आरोग्याच्या प्रश्नासाठी जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.