शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

हागणदारीमुक्तीकडे गोसेचा प्रवास ‘लय भारी’

By admin | Updated: December 24, 2015 02:27 IST

‘गाव तसं चांगलं, पण हागणदारीने वंगलं’ अशी एक म्हण प्रचलित आहे. पवनी तालुक्यातील गोसे (बुज)हे गाव ....

उपसचिवांची गावाला भेटशौचालय वापराने घडविली क्रांतीभंडारा : ‘गाव तसं चांगलं, पण हागणदारीने वंगलं’ अशी एक म्हण प्रचलित आहे. पवनी तालुक्यातील गोसे (बुज)हे गाव हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करीत असून या गावाला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव शांताराम कुदळे यांनी भेट दिली. यातून गावकऱ्यांनी शौचालय वापराचा घेतलेला निर्णय ‘लय भारी’ असल्याची प्रचिती त्यांना आली. राज्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात स्वच्छता मिशन कक्ष पाणी व स्वच्छतेच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे. या अनुषंगाने ग्राम पंचायतींना क्षेत्र भेटी देण्यासाठी कुदळे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी पवनी येथे आढावा बैठक घेतली. यावेळी सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान त्यांनी राष्ट्रीय गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. यानंतर त्यांनी लगतच्या गोसे बु. या गावाला भेट दिली. येथील त्यांनी शौचालयाची माहिती घेतली असता ते आश्चर्यचकित झाले. एकेकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्या गावकऱ्यांनी शौचालय बांधणीला पसंती दिली असून अनेक नागरिकांचे शौचालय बांधणीचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यावेळी कुदळे यांनी हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या गोसे गावातील जलसुरक्षक यांचेकडून पाणी व स्वच्छता विषयक माहिती जाणून घेतली. यावेळी ग्रामसेविका शीतल मोहनकर यांनी ग्रामपंचायतीची लोकसंख्या, कुटुंब संख्या, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, ब्लिचिंग साठ्याची उपलब्धता, शौचालय बांधकामाची स्थिती, कोरडा दिवस पाळणे आदींची माहिती दिली. गावकरी शौचालयाचा वापर करीत असल्याने हिरव्या रंगाचे स्टीकर घरांना लावण्यात आले. यावेळी कुदळे यांनी सुंदर जीवन जगून आरोग्य सुदृढ ठेवावे अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, गोसेचे सरपंच चेतन डोंगरे, भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेचे उपसंचालक शाह, वरिष्ठ भूवैज्ञानिक काजी, जलसंपदा विभागाचे बालपांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामदास धांडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता मैदमवार, खंडविकास अधिकारी भगत, उपकार्यकारी अधिकारी गोन्नाडे यांच्यासह शिक्षक संवाद सल्लागार राजेश्वर येरणे, प्रकल्प व्यवस्थापक डी.एस. बिसेन, बबन येरणे, पाणी गुणवत्ता सल्लागार प्रशांत मडामे, गजानन भेदे, नेत्रदिपक बोडखे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)