विनाकारण फिरणाऱ्या २० जणांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:30 IST2021-05-18T04:30:14+5:302021-05-18T04:30:14+5:30

गोंदिया : लॉकडाऊन असतानाही विनाकारण घराबाहेर फिरत असलेल्या २० जणांना पोलिसांनी दणका देत कारवाई केली आहे. शहर व रामनगर ...

Hit 20 people walking around for no reason | विनाकारण फिरणाऱ्या २० जणांना दणका

विनाकारण फिरणाऱ्या २० जणांना दणका

गोंदिया : लॉकडाऊन असतानाही विनाकारण घराबाहेर फिरत असलेल्या २० जणांना पोलिसांनी दणका देत कारवाई केली आहे. शहर व रामनगर पोलिसांनी ही कारवाई केली असून विविध कलमांन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

यामध्ये, शहर पोलिसांनी १६ मे रोजी दुपारी १२ ते २ वाजतादरम्यान मनोहर चौक येथे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या ७ जणांना पकडले. त्यानंतर सायंकाळी ४ वाजतादरम्यान ८ जणांना पकडले. तसेच रामनगर पोलिसांनी सायंकाळी ७.४५ वाजता दरम्यान बालाघाट टी-पॉईंट येथे ५ जणांना पकडले. अशाप्रकारे शहर व रामनगर पोलिसांनी विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या २० जणांना पकडले. त्यांच्यावर भादंवि कलम १८८, २६९ सहकलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ सहकलम ११ महाराष्ट्र कोविड विनियम २०२० अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिवाय रावणवाडी पोलिसांनीही अशीच कारवाई केली आहे.

Web Title: Hit 20 people walking around for no reason