शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाजार लिलावात सर्वाधिक रक्कम

By admin | Updated: March 24, 2017 01:35 IST

सन २०१७-१८ या वर्षाकरीता देवरी नगरपंचायतला आठवडी बाजारातून प्रथमच १० लक्ष ७० हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे.

सुविधांचा मात्र अभाव : नगरपंचायतला मिळणार १० लक्ष ७० हजारांचे उत्पन्नदेवरी : सन २०१७-१८ या वर्षाकरीता देवरी नगरपंचायतला आठवडी बाजारातून प्रथमच १० लक्ष ७० हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे. ही रक्कम यापूर्वी मिळत असलेल्या उत्पन्नापेक्षा पाच पटींनी जास्त आहे. याकरीता लिलाव प्रक्रिया गुरूवारी (दि.२३) नगरपंचायतमध्ये पार पडली. सर्वाधिक बोली बोलून आठवडी बाजार मिळविण्यात माजी सरपंच जैपाल शहारे यांनी हा लिलाव जिंकला. त्यामुळे आता आठवडी बाजाराची वसुली शहारे करतील. मागील ठेकेदारापासून दुकानदाराना होणारा त्रास बघता भाजी व्यवसायिक असलेले जैपाल शहारे यांनी बाजार मिळविला. याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला. मागील १५ दिवसापूर्वी न.पं.चे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी आठवडी बाजाराची पाहणी केली व दुकानदारांना सर्व बाबीची विचारपूस केली. त्यावेळी ठेकेदाराकडून जास्त रुपयांची वसुली व्यावसायीकांकडून होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे न.प.द्वारे नवीन शर्ती व अटी लावून आगामी वर्षाच्या बाजाराचा लिलाव करण्यात आला. नगराच्या बाजारात अनेक समस्या आहेत. काही ठिकाणी ओटे बनविण्यात आले परंतु या ओट्यावर शेड नसल्याने दुकानदारांना ऊन व पावसाचा त्रास सहन करावा लागतो. दुकानदारांनी बऱ्याचदा सुविधा पुरविण्याबाबत अगोदर ग्रा.पं. व आताच्या नगरपंचायतला कळविले. परंतु त्यांच्या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने आतातरी मुख्याधिकारी याकडे लक्ष देवून दुकानदारांना सुविधा प्रदान करणारा काय? असा सवाल केला जात आहे. तालुक्याचा सर्वात मोठा आठवडी बाजार म्हणून देवरी बाजाराची ओळख आहे. राजनांदगाव (छ.ग.) गोंदिया, आमगाव, साकोली, भंडाराचे व्यापारी येत असतात. अतिक्रमणामुळे जागा जरी कमी शिल्लक असला तरी शेकडो लहान मोठी दुकाने लागत असतात. परंतु सुविधा मिळत नसल्याने व बाजारात ठेकेदाराला जास्त पैसे द्यावे लागत असल्याने व्यापारी नाराज आहे.आतातरी सुविधा द्या!यावर्षी नगरपंचायतला १० लक्ष रुपयांच्यावर उत्पन्न मिळत असले तरी या आठवडी बाजारात मुलभूत सुविधा आतातरी मिळणार काय? असा संतप्त प्रश्न केला जात आहे. पिण्याचे पाणी, शौचालय, रस्ते व वीज या प्रमुख सुविधा मिळत नसल्याने व्यापाऱ्यामध्ये नगर पंचायतविरूध्द असंतोष बघायला मिळतो. शौचालय व पिण्याच्या पाण्याची टाकी काही वर्षापूर्वी आठवडी बाजारात बांधण्यात आली. परंतु त्याला आतापर्यंत कुलूपच लावून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दुकानदारी सोडून व्यापाऱ्यांना इतरत्र दूर अंतरावर भटकावे लागते. याचा सर्वाधिक त्रास स्त्रीवर्गाला होत असतो.