शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे पालक हिरावलेल्या बालकांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

तालुक्यातील रिसामा येथील कोरोनामुळे वडिलांचे छत्र हिरावलेल्या बालकांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शनिवारी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तालुक्यातील कोरोनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेक जण निराधार झाले. अनेकांचे छत्र हरपले. रिसामा येथील योगेश्वरी अरविंद कावळे व प्रियांका प्रशांत शहारे यांच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या कुटुंबातील प्रमुख गेल्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला, हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी खवले यांनी त्यांच्या कुटुंबाला भेट दिली.

ठळक मुद्देराजेश खवले यांचा उपक्रम : अन्नधान्य व भेट वस्तूंचे केले वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : कोरोनामुळे पालकत्व हिरावलेल्या व एकल पालक असलेल्या जिल्ह्यातील या बालकांच्या कुटुंबांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शनिवारी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची विचारपूस केली, तसेच या बालकांच्या कुटुंबांना अन्नधान्याची मदत केली, तसेच शासनाच्या योजनांचा लाभ देण्याची ग्वाही देत या बालकांचे सांत्वन केले. प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी घरापर्यंत येऊन सांत्वन केल्याने या बालकांचे नातेवाईकसुद्धा भारावून गेले होते.  तालुक्यातील रिसामा येथील कोरोनामुळे वडिलांचे छत्र हिरावलेल्या बालकांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शनिवारी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तालुक्यातील कोरोनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेक जण निराधार झाले. अनेकांचे छत्र हरपले. रिसामा येथील योगेश्वरी अरविंद कावळे व प्रियांका प्रशांत शहारे यांच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या कुटुंबातील प्रमुख गेल्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला, हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी खवले यांनी त्यांच्या कुटुंबाला भेट दिली. कुटुंबातील मुलांना फळ व बिस्कीट व जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. त्यांची आस्थेने विचारपूस करून शासनाच्या योजनांचा लाभ बालक व त्यांच्या कुटुंबीयांना देण्याची ग्वाहीसुद्धा जिल्हाधिकारी खवले यांनी दिली. हा दु:खाचा काळ आहे, शासन आपणास सर्वतोपरी मदत करणार, विधवा पेन्शन योजना व इतर सोयी- सवलतींकरिता शासनाकडून मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देवरीचे उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ, आमगावचे तहसीलदार डी.एस. भोयर उपस्थित होते. 

१५० बालकांचे वडिलांचे छत्र हरपलेकोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कहर केले. साडेपाचशेवर नागरिकांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंंबांतील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने त्या कुटुंबांवर मोठे संकट कोसळले. १५० बालकांचे वडिलांचे छत्र, तर ४७ बालकांचे आई- वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्यावर अनाथ होण्याची वेळ आली आहे. अशा बालकांचा शोध घेऊन आता शासनाकडून मदत केली जात आहे.

कोरोनामुळे आई- वडिलांचे छत्र हिरावलेल्या बालकांसाठी शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांचा लाभ त्यांना दिला जातो. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून प्रशासन तुमच्या पाठीशी खंभीरपणे उभे असल्याची जाणीव करून अशा कुटुंबांना भेट देण्याचा उपक्रम प्रशासनाने सुरू केला आहे. -राजेश खवले, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू