शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरा

By admin | Updated: December 24, 2015 02:28 IST

सार्वजनिक आरोग्याची सर्वांगिण हमी घेणाऱ्या आरोग्य विभागातील स्थानांतरणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी सह, फिरते आरोग्य पथक इळदा, ...

नागरिकांची मागणी : केशोरी, इळदा, चिचोलीत १३ पदे रिक्तकेशोरी : सार्वजनिक आरोग्याची सर्वांगिण हमी घेणाऱ्या आरोग्य विभागातील स्थानांतरणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी सह, फिरते आरोग्य पथक इळदा, आरोग्य उपकेंद्र चिचोली येथील रिक्त झालेल्या पदामुळे नागरिकांच्या आरोग्य सेवेला फटका बसत आहे. स्थानांतरणामुळे रिक्त झालेली पदे लवकरात लवकर भरण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शाखा केशोरीकडून चेतन दहीकर यांनी केली आहे. शासनाच्या आरोग्य विभागामार्फत नागरिकांच्या आरोग्य विषयक अनेक योजना प्रत्येक गावागावात कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्या योजना यशस्वीपणे चालविण्यासाठी व दैनंदिन ओपीडी सांभाळण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मंजूर असलेली सर्व पदे भरणे महत्वाचे आहे. परंतु गेल्या १५ दिवसापासून स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रासह, फिरते आरोग्य पथक इळदा, आरोग्य उपकेंद्र चिचोली येथील अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे स्थानांतरामुळे रिक्त झाली आहेत. मागील पंधरा दिवसापासून स्थानांतरणाची पदे भरण्यात आली नाही. त्यामुळे त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. रिक्त असलेल्या पदांचा कार्यभार इतर कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर देवून त्यांचा कामाचा ताण वाढविण्याची वेळ आली आहे. आरोग्य सेवा ही सर्वात महत्वाची सेवा समजली जाते. त्यामध्ये कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गट अ चे दोन पद मंजूर असून फक्तच एक कार्यरत आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ १ पद, आरोग्य सेविका २ पद, आरोग्य सहायक १ पद, मलेरिया पर्यवेक्षक पुरुष ३ पद, वैद्यकीय अधिकारी गट ब १ पद, आरोग्य पर्यवेक्षिका १ पद, शवविच्छेदन स्विपर १ पद आणि ओपीडी परिचारिका २ दोन अशी एकूण १३ पदे रिक्त आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिनस्त इळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतर सहा आरोग्य उपकेंद्राचा डोलारा सांभाळण्यासाठी मनुष्य बळाची म्हणजे मंजूर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे अत्यंत आवश्यक आहेत. या महत्वाच्या बाबीकडे जिल्हा आरोग्य प्रशासनाचे लक्ष असल्याचे दिसून येत नाही. यामुळे या परिसरातील आरोग्य सेवा खिळखिळी होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने येत्या आठ दिवसात रिक्त असलेली पदे भरावी अन्यथा शिवसेना शाखा केशोरीच्या वतीने चेतन दहीकर यांनी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राला कुुुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)